खाजगी दवाखाने 24 तास चालू ठेवा....अन्यथा....-जिल्हाधिकारी दि एम मुगळीकर


जिल्हाधिकारी दि. म. मुगळीकर यांचे आवाहन; जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा 24 तास सुरू ठेवावी
परभणी दि.30:-  जिल्ह्यातील इंडियन मेडिकल असोशियशन , आयुर्वेदिक व्यासपीठ असोशियसन , निमा असोशियशन , अध्यक्ष होमिओपॅथी असोशियशन आणि जिल्हयातील इतर वैद्यकीय सेवा देणा-या संघटनांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सेवा 24 तास अखंडितपणे सुरू ठेवाव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी दि.म. मुगळीकर यांनी केले आहे.
          राज्यात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परभणी जिल्ह्यात वैद्यकीय सेवा खंडित करण्यात येवून शहरी व ग्रामीण भागातील दवाखाने बंद असल्यामुळे आरोग्य सेवेसाठी जिल्ह्यातील नागरिकांची गर्दी एकवटत असल्याचे निदर्शनास येत आहे .
     तरी कोरोना विषाणू संसर्गच्या या आपात्कालीन परिस्थितीत जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा खंडित करण्यात येऊ नयेत तसेच आपण आपल्या ओपीडी आणि इतर सर्व वैद्यकीय सेवा सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी २४ तास नियमितपणे सुरु ठेवण्यात याव्यात. जेणेकरून दि. १४ एप्रिल २०२० पर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये आरोग्य सेवेसाठी नागरिकांची एका ठिकाणी गर्दी होणार नाही आणि कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनमध्ये सहभागी होवून या आपत्तीचा सक्षमपणे सामना करता येईल. असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
                             

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन