भगवंत पांडुरंगा कडून 1 कोटींचा निधी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी


श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी १ कोटी रुपयांचे साहाय्य


पंढरपूर (प्रतिनिधी) – राज्यातील कोरोना विषाणूच्या आपत्तीसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी १ कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी घोषित केला. याविषयी मंदिर समितीच्या वतीने प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे. मंदिर समितीच्या सर्व सदस्यांच्या संमतीने हा निर्णय मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी घेतला आहे. १४ एप्रिलपर्यंत केंद्रशासनाने दळणवळण बंदी घोषित केली असल्याने ४ एप्रिल या दिवशी होणारी चैत्र यात्रा रहित करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त पारंपरिक नित्योपचार केले जाणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन