प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भर आंदोलनात शिव्या देणे पडले महागात-झाली अटक

(परभणी : वृत्तसंस्था) सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात देशभरात आंदोलनं सुरू आहेत. तसेच राज्यातही या कायद्याविरोधात आंदोलनं सुरू आहेत. परभणीच्या पाथरीत याच आंदोलना दरम्यान दिलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींना शिवी देण्यात आली आहे. शिवी देणं या व्यक्तीला चांगलंचं भोवलं आहे. भाजप तालुकाध्यक्षाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाथरी पोलीस ठाण्यात पंतप्रधान यांना सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच सदर प्रकरणी शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला पाथरी पोलिसांनी मानवत येेेथिल शेख गणी 
शेेेख रहमान यांना अटक केली आहे.
पाथरी तहसील कार्यालया समोर सुरू असलेल्या सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात आंदोलनात मानवत येथील रहिवाशी शेख गणी शेख रहमान यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ केली आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओव सर्वत्र व्हायरल होत आहे. याच व्हिडीओचा आधार घेऊन भाजप शहराचे जिल्हाध्यक्षांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पंतप्रधानांना शिवीगाळ करणाऱ्या शेख गणी शेख रहमान यांच्याविरोधात कलम 112 आणि 117 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे

Comments

  1. लायकी नसतानाही थेट पंतप्रधानांना शिवीगाळ करणे हा चक्क त्यांचा अपमान नव्हे देशाचा अपमान आहे. अटक झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन