मनपाने पाणी पुरवठा वेळापत्रक माहिती वेळोवेळी वृत्तपत्र व वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याची मागणी


परभणी(प्रतिनिधी):- परभणी शहर महानगर पालिकेने पिण्याचे पाणी पुरवठा करताना वेळापत्रक याची माहिती नागरिकांना द्यावी अशी मागणी नागरिकांकडूूून केेली जात आहे . 
मनपा द्वारे कधी व कोठे व कोणत्या दिवशी पाणी पुरवठा होईल याची माहिती सध्या सर्व नगरसेवक आपापल्या व्हाट्सएपच्या प्रभागाच्या केलेल्या ग्रुप मधून करतात पण त्यांच्या ह्या ग्रुप मध्ये सर्वच नागरिक असतील याची खात्री नसते त्याच बरोबर पाणीपुरवठा मध्ये शहरातील काही भागात दुजाभाव केला जात असल्याचे पण बोलले जात आहे.काही भागात पाणी पुरवठा सुरू असला तरी नळाला पाणी येत नाही तर काही भागात पुरवठा कधीही होतच असतो असे प्रकार दिसत आहे, नागरिक तर येथपर्यंत चर्चा करत आहेत की मनपाला खात्री नाही की ते सांगतात त्यावेळच्या खरच पाणी जाते की नाही म्हणून ते नगरसेवकांवर ही बाब सोडून मोकळे होत आहेत. तसेच बरेच नागरिक पाणी पुरवठा नियोजन माहीत नसल्याने पाण्यापासून वंचित राहतात. अथवा शेजाऱ्याने मोटार लावली याचा आवाज ऐकून पाणी आल्याचे ग्राह्य धरतात. पाणी न मिळाल्यास 15 दिवस पाणी विकत घायवे लागत आहे हा आर्थिक भुरदण्ड नागरिकांना सहन करावा लागत आहे  त्यामुळे जर अधिकृत पणे मनपाने पाणी पुरवठा विषयी माहिती वृत्तपत्रातून व वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यास हवी अशी मागणी होत आहे.
प्रसिद्धी विभागाकडे शहरातील झोन प्रमाणे कोणत्या झोनला कोणत्या परिसरात कधी व किती वाजता पिण्याच्या पाणी पुरवठा मनपा करणार आहे याची माहिती स्थानिक वृत्तपत्रद्वारे तसेच स्वतःच्या वेबसाईटवर अपलोड केली तर शहरातील सर्व नागरिकांना याचा लाभ होऊन पाण्यापासून कोणी वंचित राहणार नाही नगरसेवक तर त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत पण मनपा ची पण जबाबदारी आहे की नागरिकांना अधिकृत माहिती मिळावी.मनपाचे महापौर व आयुक्त यांंनि सदरील माहिती त्वरित नाागरिकाना कधी  देतील  याकडे सर्वाांचे लक्ष लागले आहे

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन