हातगाड्यावर अन्न पदार्थ विक्रेत्यांना ड्रेसकोड ठरला तो परिधान करून व्यवसाय करावा



हातगाड्यांवरील अन्न पदार्थ विक्रेत्यांना आता ‘ड्रेसकोड’

·अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते ड्रेसकोड वाटपाचा शुभारंभ

· ॲप्रॉन, हॅन्डग्लोज व कॅपचे वाटप,  

(बुलडाणा/प्रतिनिधी) :- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकारातून व संकल्पनेतून राज्यातील सर्व हातगाड्यांवरील अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना ड्रेस कोड लागू करण्यात येत आहे. . त्यानुसार सदर मोहिमेची सुरूवात आजपासून बुलडाणा शहरातून करण्यात आली. अन्न्‍ व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज चिंचोले चौक, चौपाटी येथे हातगाडीवर पाणीपुरी, पावभाजी, भेळ, चायनीज, आईसस्क्रीम आदी अन्न्‍ पदार्थ व्रिकेत्यांना ॲप्रॉन, हॅन्डग्लोज व कॅपचे या ड्रेसकोडचे वाटप केले. तसेच विक्रेत्यांच्या हातांची, नखांची स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून तपासणी करीत त्यांचे परवानेही तपासले.

    यावेळी  पालकमंत्री म्हणाले, सर्व हातगाडीवरील अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी चांगल्या व स्वच्छ वातावरणात विक्री करावी. त्यासाठी सर्वांनी स्वच्छता पाळावी. यापुढे अन्न्‍ व औषध प्रशासन विभाग राज्यात हातगाड्या तपासण्याची मोहिम राबविणार आहे. यामध्ये हातगाडीवरील विक्रेत्यांना ॲप्रॉन, हॅन्डग्लोज व कॅप घालणे विक्री करतेवेळी बंधनकारक करणार आहे. तरी सर्व विक्रेत्यांनी हातगाडीजवळ स्वच्छता ठेवावी  व अन्न पदार्थ उघड्यावर ठेवू नये. अधिकाऱ्यांनी हातगाडीवरील विक्रेत्यांची  तपासणी करून काही त्वचारोग तर नाही, ना याची खात्री करून घ्यावी, असे निर्देशही मंत्रीमहोदयांनी यावेळी केले. विक्रेत्यांन यापुढे अन्न पदार्थांची विक्री करताना हॅन्डग्लोजचा वापर कटाक्षने करावा. याचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त सचिन केदारे, गजानन घिरके, जनसंपर्क अधिकारी संतोष लोखंडे व विक्रेते उपस्थित होते
                                                                     

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन