आजच्या तरुणाईने देश धर्म माता व पिता यांना अभिमान वाटावा असे कार्य करावे




आजच्या युवकांनी देश धर्म माता व पिता यांना अभिमान वाटावा असे कार्य करावे
(परभणी/प्रतिनिधी )शहाजीराजे भोसले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि त्याचा गाभा अभिमान वाटावा असे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले त्यामुळे प्रत्येक मुलांनी आपल्या आई-वडिलांना देशाला व धर्माला अभिमान वाटावा असे असे विधायक कार्य करावेत असे  प्रतिपादन सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराजांचे शिष्य डॉक्टर रामपाल महाराज धारकर यांनी केले.
शहरातील कारेगाव रोड वरील उघड़ा महादेव येथे (दी.8) रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवसेना उपशहरप्रमुख सचिन पाटील यांच्यावतीने  आयोजित  किर्तन आणि व्याख्यान सोहळ्याच्या  प्रसंगी डॉ.रामपाल महाराज धारकर बोलत होते.  यावेळी  झी टॉकीज फेम,युवा कीर्तनकार  विनोदाचार्य ह भ प शिवलिलाताई पाटील महाराज,  डॉ.रामपाल महाराज ,महापौर अनिता रविंद्र कांबळे, शिवसेना महिला आघाडी  जिल्हाध्यक्ष सखुबाई लटपटे ,मनपा सदस्य  विशाल बुधवंत , विधिज्ञ पवन निकम , प्रा.डॉ.शिवाजी पौळ, आयोजक  तथा शिवसेना उपशहर प्रमुख सचिन पाटील आदींची उपस्थिती होती . पुढे बोलताना डॉक्टर रामपाल महाराज धारकर म्हणाले की मुलामुलींनी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे. जगावं कसं छत्रपती संभाजी महाराजांनी तर मराव  कस हे शहीद भगतसिंग यांनी शिकवले. आईवडिलांनी मुलांचे कौतुक करावे.  आई-वडिलांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावे .मुलांनी मोबाईल, दारू सारख्या व्यसनापासून दूर राहत वाचन संस्कृती जोपासली पाहिजे असे सांगितले. युवा कीर्तनकार विनोदाचार्य ह भ प शिवलिलाताई पाटील यांनी आपल्या कीर्तनरूपी वानीतुन  उपस्थितांना समाजप्रबोधन करून मंत्रमुग्ध केले. प्रास्ताविक आयोजक तथा शिवसेना उपशहरप्रमुख सचिन पाटील यांनी केले. सूत्रसंचालन राम पवार व सखाराम रणेर यांनी तर आभार सुमित बंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व मित्र परिवार यांनी पुढाकार घेतला.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन