परभणीत चिरायू हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्ण आढळून आला ही बातमी अफवा आहे


परभणी :- आज परभणीत चिरायू हॉस्पिटल येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात विविध सोशल मीडियावर व काही न्युज चॅनेल व्हायरल झाली होती परंतु सम्पूर्ण पडताळणी नंतर असे निदर्शनास आले की ही बातमी अफवा होती तसेच हॉस्पिटल प्रशासनाने लेखी कळवल्याने नागरिकांमधून भीतीचे वातावरण सौम्य झाले 
प्रशासनाने हा खोडसाळपना करणाऱ्या लोकांचा तपास करून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले  आहेत
आता पर्यंत जिल्ह्यात 3 संशयित रुग्ण आढळून आले आहेत त्याना आयसोलेशन वॉर्ड मध्ये दाखल केले असून त्यांचे नमुने तपासणी करिता पुणे येथे लॅबकडे पाठवले आहेत पण त्या या कोरोना झालाच आहे असे नाही उद्या पर्यंत याचा अहवाल प्राप्त होईल त्यानुसार त्यांचेवर पुढील उपचार सुरू केले जातील बाकी सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचे कळवण्यात आले आहे
नागरिकांनी कोणत्याही बातमीची शहानिशा न करता कोणत्याही पोस्ट अथवा व्हिडीओ किंवा फोटो समाज माध्यमातून व्हायरल करू नयेत अन्यथा अफवा पसरवण्याच्या गुन्हा दाखल केले जातील असे जिल्हाधिकारी दि म मुगळीकर यांनी कळवले आहे

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन