प्रतिबंधित मागूर माशांचा मत्स्यसाठा नष्ट करण्यात आला


प्रतिबंधित मागूर माशांच्या मत्स्यसाठ्यावर कारवाई
अलिबाग (वृत्तसंस्था)- राष्ट्रीय हरीत लवाद, नवी दिल्ली यांनी दि. 22 जानेवारी 2019 च्या आदेशान्वये विदेशी मागूर (Clarius gariepinus) याचे देशातील अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रायगड-अलिबाग या कार्यालयाने जिल्ह्यातील मागूर मत्स्यसाठ्यांवर कारवाई करण्यास सूरूवात केली आहे. 
दि. 6/3/2020 रोजी पनवेल तालूक्यातील पनवेल, कामोठे, खारघर आणि तळोजे येथील मासळी विक्री केंद्रास भेट देण्यात आली. यावेळी कामोठे येथील एक व तळोजा येथील आठ मत्स्यविक्रेते मागूर माशांची विक्री करताना आढळले. या विक्रेत्यांना नोटीस देण्यात आली असून या माशांची या पुढे विक्री करू नये अशी समज देण्यात आली. 
दि. 7/3/2020 रोजी खालापूर तालूक्यातील या विभागाच्या पथकाने पाहणी केली असता महड गावातील एका मत्स्यसंवर्धकाच्या तलावामध्ये प्रतिबंधित मागूर मत्स्यसाठा आढळला. या मत्स्यसंवर्धनास यापूर्वी नोटीस देऊन देखील मत्स्यसाठा नष्ट केला नव्हता. त्याअनुषंगाने या कार्यालयाच्या पथकाने मत्स्यसंवर्धन तळ्यांच्या बाजूला खड्डा खणून अंदाजे 3000 किलो मासळी खड्डयात टाकून नष्ट करण्यात आला. तसेच दि. 14/3/2020 रोजी माजगांव ता. खालापूर येथील एका मत्स्यसंवर्धकाच्या तलावावर अशाचप्रकारे मागूर माशांचा मत्स्यसाठा आढळल्याने अंदाजे 1500 ते 1700 किलो मत्स्यसाठा नष्ट करण्याची कारवाई या विभागामार्फत करण्यात आली. 
राष्ट्रीय हरीत लवाद, नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये विदेशी मागूर माशांचे मत्स्यसंवर्धन व विक्री करण्यास बंदी असल्याने कोणीही या माशांचे संवर्धन करू नये असे सहाय्यक आयुकत मत्स्यव्यवसाय, रायगड-अलिबाग यांनी आवाहन केले आहे. प्रतिबंधित मागूर माशांचे संवर्धन अथवा विक्री करताना कोणी आढळल्यास मत्स्यव्यवसाय कार्यालयास दु.क्र. 02141-224221 या क्रमांकावर संपर्क साधावा असे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन