आपत्काळ म्हणतात तो हाच ...सर्व ठिकाण उद्या पासून बंद दिसणार..नागरिकांनी सावधगिरी पाळावी


कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सिनेमागृहे, मॉल इतर दुकाने नाटयगृहे बंद 
*नगरपालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्या राहणार बंद
* 31 मार्च 2020 पर्यंत असणार बंद
परभणी (प्रतिनिधी):- शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1887 दिनांक 13 मार्च 2020 पासुन लागु करून अधिसूचना निर्गमित केली आहे. करोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून राज्यातील सर्व महानगरपालिका,  सर्व नगरपालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा व अंगणवाडया,  महाविदयालो व आयुक्त, व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे यांचे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये, निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदी नुसार सक्षम प्राधिका-याच्या मान्यतेने दिनांक 31 मार्च ,2020 पर्यत बंद ठेवणे बाबत सूचित करण्यात आले आहे.  
   उपसचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचे दिनांक 14 मार्च 2020 च्या पत्रानुसार  सर्व नगरपालिका, सर्व नगरपंचायत क्षेत्रातील 10 वी व 12 वी च्या परिक्षा विहीत वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात. त्याचप्रमाणे आजारी विदयार्थी इतर विदयार्थ्याच्या संपर्कात येणार नाही,  यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत. तसेच प्रधान सचिव,सार्वजनिक आरोग्य विभाग,  यांचे  15 मार्च 2020 रोजी मिळालेल्या सूचनांनुसार जिल्ह्यातील 
सर्व सिनेमागृह, नाटयगृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा, म्युझियम मॉल इतर सर्व आस्थापने दुकाने  (किराणा समान दुकान औषधी दूध भाजीपाला जीवनावश्यक वस्तू दुकान वगळून) इत्यादी बंद ठेवणेबाबत सूचना  निर्गमीत करण्याबाबत निर्देश आहेत.
    भारतीय साथरोग अधिनियम 1897 मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी यांनी करोना विषाणू चा  होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून परभणी जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, अंगणवाडया तसेच महाविदयालये, आयुक्त व्यवसाय प्रशिक्षण केंद्र यांचे आस्थापनेवरील सर्व शैक्षणिक संस्था, खाजगी कोचिंग क्लास
इत्यादी  31 मार्च 2020 पर्यत बंद ठेवणेबाबत आदेश निर्गमीत केले आहे. तसेच नगरपालिका,  नगरपंचायत क्षेत्रातील इयत्ता 10 वी व 12 वी च्या परिक्षा विहीत वेळापत्रकानुसार घेण्यात येवून आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही, यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.   तसेच जिल्ह्यातील सर्व सिनेमागृहे,  नाटयगृह, जलतरण तलाव, व्यायाम शाळा, म्युझियम आदी दिनांक 31 मार्च 2020 पर्यत बंद ठेवण्याचे  आदेश देण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन