उन्हामुळे अथवा उष्णतेने खरंच कोरोना मरेल का ?


उन्हामुळे खरंच कोरोना मरेल का ? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे आणि सगळे पण हेच म्हणत आहेत की होऊद्या उन्हाळा सुरू कोरोना पळून जाईल पण सत्यता काय आहे 
सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेलं आहे.
आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे ४,५०० जणांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये कोरोनाचे ७३ रुग्ण सापडले आहेत. भारतामध्ये लवकरच उन्हाळा सुरु होणार आहे. वाढत्या तापमानामध्ये कोरोना जिवंत राहू शकत नाही, असं बोललं जात होतं. पण उन्हामुळे कोरोना मरतो, हे सिद्ध करणारा कोणताही अभ्यास झालेला नाही किंवा तसे पुरावेही नाहीत, असं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलं आहे. याकरिता नागरिकांनी प्रत्येकवेळी स्वच्छता राखलेली बरी राहील हाच खूप महत्त्वाचा व अत्यावश्यक उपाय सर्वांनी सातत्याने करावेत अश्याने किमान करोनाची लागण होण्याचा धोका बऱ्याच प्रमाणत टाळता येतो कोरोना व्हायरस दूर ठेवणं कठीण आहे. कोरोनावर लस तयार करायला निदान एक ते दीड वर्ष लागेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारतातल्या ३० विमानतळांवर १०.५ लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तसंच दीड हजार जणं निरिक्षणाखाली आहे, असंही आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. तेव्हा केवळ ऐकीव गोष्टीवर विश्वास न ठेवता प्रत्येक वेळी एक साफ हातरुमाल जवळ बाळगा गर्दी ठिकाणी जाण्याचे टाळा वेळोवेळी हात पाय स्वच्छ धुवावेत शिक व खोकला आला तर तोंडावर रुमाल अथवा हात झाकवा लगेच हात धुवावेत आता सध्यातरी हाच प्राथमिक उपाय मोठ्या प्रमाणात करून ह्या विषाणूचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी टाळाव्यात 

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन