परभणीत विशेष पोलीस पथकाने शिवराम नगर मधील जुगार अड्ड्यावर मारला छापा ....लाखोंचा मुद्देमाल जप्त


परभणीत विशेष पोलीस पथकाने शिवराम नगर मधील जुगार अड्ड्यावर मारला छापा ....लाखोंचा मुद्देमाल जप्त 

परभणी (प्रतिनिधी) :-  पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. शहरातील शिवराम नगर वसाहतीत हा जुगार अड्डा सुरू होता. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मध्यरात्री धाड टाकून सात जुगाऱ्यांना अटक केली आहे. या जुगाऱ्यांकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य, असा एकूण 3 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . पोलिसांनी छापा मारला तेव्हा, शेख हबीब शेख मासूम, मतीन खान मकसूद खान, युसूफ खान शब्बीर खान पठाण, किशोर श्रीकिशन तोष्णीवाल, सिध्दार्थ हरिभाऊ खाडे, सय्यद हनीफ सय्यद अहमद व गोविंद एकनाथ काकडे या 7 जुगाऱ्यांचा पत्याचा डाव रंगला होता. तेव्हा पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले.परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मिना यांच्या विशेष पथकाने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील शिवराम नगर परिसरात हा छापा टाकला. शिवराम नगरातील गोविंद काकडे यांच्या घरात चालणाऱ्या या  जुगार अड्ड्यावर 'झन्नामन्ना' नावाचा जुगार खेळण्यात येत होता. प्रकरणी पोलीस नाईक राहुल दत्तात्रय चिंचाणे यांच्या तक्रारीवरुन कलम ४,५,१२ ( अ ) प्रमाणे नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही धाडसी कारवाई सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस नाईक यशवंत वाघमारे, राहुल चिंचाणे, शंकर गायकवाड, शेख अजहर, दीपक मुदिराज, जब्बार या विशेष पथकाने ही कारवाई पार पाडली.


Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त