परभणीत पदवीधर संघाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ भाजपद्वारे फेरी

परभणीत पदवीधर मतदारसंघ चे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ भाजपद्वारे फेरी 



परभणी,दि.20(प्रतिनिधी) ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष- भारतीय रिपब्लिकन पक्ष - राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाच्या महानगर जिल्हा शाखेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि.20) शासकीय-निमशासकीय कार्यालयांमधून प्रचारफेरी काढली. महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, प्रदेश कार्यकारणी सदस्य मोहन कुलकर्णी, संजय शेळके, एन.डी. देशमुख, राजेश देशमुख, प्रशांत पार्डीकर, रितेश जैन, मुकुंद खिल्लारे, दिनेश नरवाडकर, संजय रिझवानी, अरविंद शहाने, रामदास पवार, संदीप शिंदे, दिपक शिंदे, अनंत गिरी, संतोष जाधव आदींनी जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा व सत्र न्यायालयातील अधिकारी - कर्मचारी, वकील या पदवीधर मंडळींशी संपर्क साधून बोराळकर यांना पहिल्या पसंतीच्या क्रमांकाचे मत द्यावे, असे आवाहन केले.

Comments

Popular posts from this blog

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज