पठाण मागतो लाभार्थ्याला प्रधानमंत्री आवास योजनेचा हप्ता देणेकरिता पाच हजाराचा हिस्सा .. एसीबीने केले गजाआड

पठाण मागतो लाभार्थ्याला प्रधानमंत्री आवास योजनेचा हप्ता देणेकरिता पाच हजाराचा हिस्सा .. एसीबीने केले गजाआड

परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी) - यातील तक्रारदार यांचे नावे गजानन नगरी गंगाखेड येथील जागेवर प्रधानमंत्री नागरी आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे.त्याचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. त्यानंतर बाकीचे हप्ते कधी मिळतात याबाबत विचारणा करण्यासाठी तक्रारदार हे नगरपरिषद गंगाखेड येथे गेले असता आरोपी तेथील सर्व्हेयर सरफराज पठाण यांनी तक्रारदार यांना तुमच्या घराचे जिओ टॅगिंग चे काम केल्याने तुम्हाला साठ हजार रुपयाचा दुसरा हप्ता तुमच्या खात्यावर पडणार आहे.घरकुलाचे उर्वरित अनुदानासाठी जिओ टॅगिंग चे काम करून अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यावर जमा करणे कामी मला पाच हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणुन लाचेची मागणी केली. घरकुलाचे अनुदानाचा दुसरा हप्ता जमा झाल्यानंतर दि.29/01/24 रोजी तक्रारदार यांना यातील आरोपी यांनी तुमच्या बँक खात्यात अनुदानाचा दुसरा हप्ता जमा झाला आहे, तुम्हाला यापूर्वी सांगितल्या प्रमाणे मला येऊन भेटा असे फोनवर कळविले. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि.30/01/2024 रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या लाचमागणी पडताळणी कारवाई दरम्यान यातील आरोपी यांनी तक्रारदार यांना त्यांचे घरकुलाचे जिओ टॅगिंग आणि उर्वरित अनुदानाच्या हफ्त्याचे काम करण्यासाठी 5000/- रू रक्कमेची लाचमागणी केली. सापळा कार्यवाही दरम्यान यातील आरोपीने पंचासमक्ष 5000/- रू लाचेची रक्कम स्वतः स्विकारली आहे. आरोपी यास ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशन गंगाखेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याकरिता मार्गदर्शक डॉ.राजकुमार शिंदे,पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो नांदेड,रमेशकुमार स्वामी, अपर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड पर्यवेक्षण अधिकारी श्री अशोक इप्पर, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, सापळा तपास अधिकारी श्री.बसवेश्वर जकीकोरे पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो,परभणी. सापळा कारवाई पथक पोह निलपत्रेवार, पोशि अतुल कदम, जिब्राईल शेख, चापोह कदम, अँटी करप्शन ब्युरो, युनिट परभणी

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन