छत्रपती श्री शिवाजी महाराज व माँ जिजाऊ बद्दल मोबाईलवर अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या पालम येथील त्या पोलीस कर्मचाऱ्यासअटक

छत्रपती श्री शिवाजी महाराज व माँ जिजाऊ बद्दल मोबाईलवर अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या पालम येथील त्या पोलीस कर्मचाऱ्यासअटक

परभणी ( प्रतिनिधी) :- पालम येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ बद्दल मोबाईलवर बदनामीकारक अपशब्द वापरले होते ही ऑडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाली सदरील वक्तव्य करणाऱ्या कर्मचाऱ्यावर करवाई करण्यात यावी याकरिता पालम बंद पुकारला गेला होता ह्यावर परभणी याचे परिणामी सदरील कर्मचाऱ्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक उपाध्याय यांनी सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे.
अपशब्द वापरणाऱ्या पालम येथील पोलीस कर्मचारी जगन्नाथ गंगाराम काळे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे.
पालम पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या जगन्नाथ गंगाराम काळे याने छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ बद्दल अपशब्द वापरल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. याच्या निषेधार्थ पालम बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.
यानंतर काळे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली असल्याचे पोलीस प्रशासनाकडून कळविले आहे तसेच सदरील ऑडियो 
क्लिप कोणीही यापुढे वायरल करू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन