आपत्काळात घरगुती गणेशोत्सव कसा साजरा करावा

 आपत्काळात घरगुती गणेशोत्सव कसा साजरा करावा ?

Ganesh murti - 15 free HQ online Puzzle Games on Newcastlebeach 2020!

१. आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने धर्मशास्त्रात सांगितलेला पर्याय अर्थात् ‘आपद्धर्म’ !

सध्या जगभरात कोरोना महामारीमुळे सर्वत्रच लोकांच्या दळणवळणावर अनेक बंधने आली आहेत. भारतातही विविध राज्यांमध्ये  लॉकडाऊन आहे. काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला, तरी तेथे लोकांच्या घराबाहेर पडण्यावर अनेक बंधने आहेतच. यामुळे हिंदूंचे विविध सण, उत्सव, व्रते नेहमीप्रमाणे सामूहिकरित्या करण्यावर बंधने आली आहेत. कोरोनासारख्या आपत्काळाच्या पार्श्‍वभूमीवर धर्माचरणात काही पर्याय सांगितले आहेत. यास ‘आपद्धर्म’ असे म्हणतात. आपद्धर्म म्हणजे ‘आपदि कर्तव्यो धर्मः ।’ म्हणजे ‘आपत्काळात धर्मशास्त्राला मान्य असलेली कृती.’

२. गणेशचतुर्थी व्रत कशा प्रकारे करावे ?

गणेशोत्सव हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ हजार पटींनी कार्यरत असते. सध्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध आहेत. या अनुषंगाने आपद्धर्म आणि धर्मशास्त्र यांची सांगड घालून देखावे, रोषणाई आदी न करता साध्या पद्धतीने हे पार्थिव सिद्धिविनायकाचे व्रत पुढील पद्धतीने करता येईल. प्रत्येक वर्षी बर्‍याच घरात शाडूची माती, प्लास्टर ऑफ पॅरिस आदींपासून बनवलेल्या मूर्तीची पूजा केली जाते. यावर्षी ज्या भागात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव अल्प आहे म्हणजेच ज्या भागात दळणवळण बंदी नाही, अशा ठिकाणी नेहमीप्रमाणे गणेशमूर्ती आणून तिची पूजा अर्चा करावी. ज्यांना काही कारणास्तव घराबाहेर पडणेही शक्य नाही, उदा. कोरोनाच्या संसर्गामुळे आजूबाजूचा परिसर अथवा इमारत प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित झाले असेल, तेथील लोक गणेशतत्त्वाचा लाभ व्हावा, यासाठी आपल्या घरातील गणेशाची मूर्ती अथवा गणेशाच्या चित्राचे षोडशोपचार पूजन करू शकतात. 

हे पूजन करत असतांना पूजेतील ‘प्राणप्रतिष्ठा’ हा विधी करू नये, हे लक्षात घ्यावयाचे महत्त्वाचे सूत्र !

विशेष सूचना : गणेशमूर्ती आणतांना तसेच विसर्जन करतांना घरातील मोजक्याच व्यक्तींनी जावे. मूर्ती विसर्जन करतांना आपल्या घराजवळील तलाव, विहीर यांमध्ये विसर्जन करावे. या काळात गर्दी होण्याचा धोका अधिक असल्याने शासनाने कोरोना संदर्भात सांगितलेल्या मार्गदर्शक सूत्रांचे तंतोतंत पालन करणे, हे आपल्या सर्वांचेच आद्यकर्तव्य आहे. - संकलक - सौ मेघा संतोष जोशी कोल्हापुर

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन