स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू नारायणराव सावरकर यांची मुलगी स्नेहलता साठे यांचे निधन

 स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू नारायणराव सावरकर यांची मुलगी स्नेहलता साठे यांचे निधन

मुंबई, १३ ऑगस्ट (प्रतिनिधी) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लहान बंधू नारायणराव सावरकर यांची कन्या स्नेहलता सदाशिव साठे (वय ८२ वर्षे) यांचे दीर्घ आजाराने दादर येथे त्यांच्या रहात्या घरी निधन झाले. त्या कर्करोगाने आजारी होत्या. त्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतणी आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वर्गीय विक्रमराव सावरकर यांच्या भगिनी होत्या. स्नेहलता साठे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर कार्य केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या त्या सक्रीय सदस्या होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य राष्ट्रीय पातळीवर विस्तारित व्हावे, यासाठी त्यांची तळमळ असायची. लहानपणापासून त्यांचा सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा. विवाहानंतर त्यांनी एम्.ए.ची पदवी संपादन केली. विक्रमराव सावरकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या जडणघडणीत त्यांचा मोठा हातभार होता. विक्रमराव सावरकर यांच्या अनेक राजकीय चळवळीतही त्यांनी सक्रीय भाग घेतला. त्यांनी नंदादीप या संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी महिलांचे संघटन करून विविध सामाजिक उपक्रम आणि राष्ट्रजागृतीपर कार्यक्रम राबवले. त्यांच्या पश्‍चात कन्या डॉ. उत्तरा सहस्रबुद्धे, चित्रा मसलेकर आणि मुलगा इंद्रजित साठे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.


Comments

  1. भावपूर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन