परभणीत 'सनातन उत्थान'चा जयघोष! रोकडा हनुमान मंदिरात सामूहिक हनुमान चालीसा पठण; बागेश्वर धाम सरकारचे ऑनलाईन मार्गदर्शन
परभणीत 'सनातन उत्थान'चा जयघोष! रोकडा हनुमान मंदिरात सामूहिक हनुमान चालीसा पठण; बागेश्वर धाम सरकारचे ऑनलाईन मार्गदर्शन
परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी): परभणी येथील प्रसिद्ध श्री रोकडा हनुमान मंदिर येथे काल, दिनांक ०१ जुलै रोजी सायंकाळी ठीक ८:१५ वाजता 'परभणी बागेश्वर धाम शिष्य मंडळा'च्या वतीने सामूहिक हनुमान चालीसा पठणाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. 'सनातन उत्थानाचा संकल्प आणि दिव्य ध्येय डोळ्यांसमोर ठेवून या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.
बागेश्वर धाम सरकारचे ऑनलाईन मार्गदर्शन आणि शुभेच्छा
या पठण सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, हनुमान चालीसा पठणानंतर संपूर्ण भारतभरातील बागेश्वर धाम शिष्यमंडळाशी बागेश्वर धाम पिठाधीश्वर, पूज्य गुरुदेव पंडित श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री जी महाराज यांनी ऑनलाईन माध्यमातून थेट संवाद साधल . या ऑनलाईन संवादादरम्यान गुरुदेवांनी सर्व भाविकांना आणि शिष्यांना 'सनातन उत्थान' आणि धर्म रक्षणासाठी प्रेरित करत विशेष मार्गदर्शन केले, तसेच परभणीसह देशभरातील शिष्यांना त्यांच्या पुढील धार्मिक व सामाजिक कार्यास मनापासून शुभेच्छा दिल्या.
परभणीचे पदाधिकारी आणि भाविकांची ऑनलाईन उपस्थिती
'एक संकल्प, एक लक्ष्य - सनातन उत्थान' या मोहिमेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हे सामूहिक आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या वेळी परभणी बागेश्वर धाम शिष्य मंडळाचे प्रमुख पदाधिकारी देखील ऑनलाईन माध्यमातून जोडले गेले होते.
या भव्य दिव्य उपक्रमाला परभणीतील अनेक सनातनप्रेमी, भाविक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. "जो जहाँ है, वहीं से सहभागिता करें" (जो जिथे आहे, त्याने तिथूनच सहभागी व्हावे) या गुरुदेवांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, परभणीकरांनी रोकडा हनुमान मंदिरात उपस्थित राहून या मोहिमेत आपले योगदान दिले. संपूर्ण मंदिर परिसर यावेळी 'जय सियाराम' आणि 'जय बागेश्वर धाम' च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.



Comments
Post a Comment