मराठवाड्याचा हवामानाचा अचूक अंदाज करिता रडार आवश्यक - मयुरेश प्रभुणे

मराठवाड्याच्या हवामानाचा, अचूक अंदाजा साठी रडारची आवश्यकता : मयुरेश प्रभुणे 


औरंगाबाद (टिळक रत्न प्रतिनिधी) : प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यान माले चे दुसरे पुष्प आज स्व.गोविंदभाई श्रॉफ सभागृहात गुंफण्यात आले. बदलत्या हवामानाचे आव्हान या विषयावर प्रसिद्ध हवामान अभ्यासक मयुरेश प्रभूने यांनी विचार मांडले ते बोलत असताना असे म्हणाले की, हजारो वर्षापासून पृथ्वीवर सूर्यामुळे व सूर्यावरील सौर डागांमुळे हवामानामध्ये थंड ,गरम किंवा अति पर्जन्य वृष्टी असे बदल वेळोवेळी होत असतात. या बदलामुळे मानवी जीवनावर व शेतीवर तथा शहरीकरणावर परिणाम होणार आहेत. अशा होणाऱ्या परिणामांचा वेळेआधीच अभ्यास करून समाजाला अगोदरच सुचित करता येते. त्यासाठी हवामान अभ्यास चळवळ उभारावी लागेल. तसेच हवामान अभ्यासाविषयी सरकारी धोरणांमध्ये कालानुरूप बदल करणे आवश्यक आहे . शहरीकरण जागतिकीकरण व ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट मुळे आज खूप मोठ्या प्रमाणावर कार्बनचे उत्सर्जन होत आहे. त्याचा परिणाम हा शेती व मानवजातीवर होत आहे. त्यासाठी आपण सर्वांनी अभ्यास करून वेळोवेळी नवीन बदल स्वीकारले पाहिजेत. सरकारने देखील नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान असणारे हवामान बदलाचे माहिती देणारे रडार बसवले पाहिजेत, मराठवाड्यामध्ये झालेली अतिवृष्टी , विदर्भात झालेली गारपीट ,वेळोवेळी येणारी वादळे यापासून आपण शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानी पासून आधीच त्यांना सज्ज करू शकतो. हवामानामध्ये होणारे बदल हे तात्काळ होत नाहीत. विशिष्ट अशा क्रमबद्ध पध्दतीने बदल होत आसता. ते बदल आपल्या लक्षात आले पाहिजेत, तसेच त्यावर अभ्यास करून अगोदर आपण उपाययोजना करू शकतो. व त्या केलेल्या उपाय योजना जनतेपर्यंत ,शेतकऱ्यांपर्यंत, पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. तरच आपला शेतकरी कामगार ,कष्टकरी या बदलत्या संकटा मधून वाचू शकतो. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून व समाजातील प्रत्येक घटकाने या दृष्टिकोनातून सतर्क असले पाहिजे. या विषयातील अभ्यास असणारे कार्यकर्ते व विविध एनजीओ मार्फत सतर्कता अभियान सुरू केले आहे. त्या अभियानामुळे देखील त्यांनी शेतकऱ्यांसाठी होणारा उपयोग सांगितला. अगोदर माहिती व दरड कोसळण्याच्या घटना ह्या वेळेआधीच आपण समाजाला सांगु शकतो. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पशुहानी आणि वित्तहानी आपण टाळुता येऊ शकते असे ही त्यांनी सांगितले. यावेळी प्रश्नोत्तरामध्ये सांगितले. अनेकांनी यावेळी प्रश्न विचारले. जलयुक्त शिवार योजनेवर बोलत असताना त्यांनी असे सांगितले, की जलयुक्त शिवार योजने मुळे मराठवाड्यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही, तर जलयुक्त शिवार योजनेमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीमध्ये सकारात्मक बदल झाला आहे. एक वेळेस पीक घेणारे शेतकरी दोन ते तीन वेळी पीक उत्पादन घेऊ लागली आहेत. तसेच कुपनलिका (बोअरवेल) विहीरीची पाणी पातळी मध्ये मोठी वाढ झाली आहे. नदी,ओढे,तलाव यातील गाळ काढल्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढली, नदीचे जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता वृध्दीगंत झाली, असे सर्व सकारात्मक बदल जलयुक्त शिवार या योजनेमुळे झाले. ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची आहे असे देखील मयुरेश प्रभूने म्हणाले. त्यामुळे या योजनेवर टीका करणाऱ्या वृत्तीच्या लोकांचे मत हास्यास्पद वाटते असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य व मराठवाडा युवा विकास मंडळाचे उपाध्याक्षा डॉ.योगिता तौर होके पाटील उपस्थित होत्या. त्यांनी प्रस्तावने मध्ये मराठवाडा युवक विकास मंडळ करत असणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. मराठवाडा युवा विकास मंडळ हे विद्यार्थी परिषद च्या पूर्व कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय हित विचारात घेऊन सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन आहे ,असे म्हणाल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ .मीनाक्षी बत्तीसे, नारीशक्ती प्रमुख, पर्यावरण विभाग, देवगिरी प्रांत या व्यासपीठावर उपस्थित होत्या. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी मराठवाडा युवक विकास मंडळाचे सचिव व्यंकटेश कमळू, सहसचिव डॉ.राम बुधवंत, सुनील जाधव,ज्ञानेश्वर शिंदे,किरण जंजाल, डॉ.अरुणा म्हारोळकर यांनी परिश्रम घेतले .या वेळी हरीश कुलकर्णी, रमेश पांडव, रत्नाकर कुलकर्णी, प्रवीण घुगे , सर्जेराव वाघ आदी सभागृहात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अश्विन राजंनीकर यांनी केले कार्यक्रमाचे समारोप वैष्णवी दांडगे यांच्या पसायदानाने झाला.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन