सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गाची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली पाहणी नागरिकांच्या तक्रारी व समस्या तातडीने दुरुस्तीची सूचना

सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गाची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली पाहणी नागरिकांच्या तक्रारी व समस्या तातडीने दुरुस्तीची सूचना 


औरंगाबाद (टिळक रत्न प्रतिनिधी) : सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) अंतर्गत आलेल्या तक्रारी नुसार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पाहणी केली. रस्त्यावर पडलेले खड्डे व पुलाजवळ तडे आणि चिरा तातडीने दुरुस्ती करावे, अशी सूचना संबंधित अधिकारी यांना दिल्या. तसेच फतीयाबाद, टापरगाव, गल्ले बोरगाव - देवगाव  फाटा, कसाबखेड - शिवूर रोड आदी रस्त्यांची पाहणी करून दुरुस्ती सूचना यावेळी खैरे यांनी दिली. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ (२११) सोलापूर - धुळे रस्त्यांचे काम जवळपास पुर्ण झाले आहे. मात्र स्थानिक नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लक्ष्य घातले. या पाहणीस शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत, प्रकल्प संचालक अविनाश काळे, महेश पाटील, आशिष देवतकर, बिपीन वर्मा, संघर्ष समिती अध्यक्ष तथा शिवसेना तालुका संघटक डॉ. अण्णासाहेब शिंदे, अंधानेर सरपंच अशोक दाबके, राजू राठोड, डॉ. एस. जे. जाधव, डॉ. सदाशिव पाटील, विभागप्रमुख सोपान गोलाईत, विजय बारगळ आदींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. औटम घाटात बोगदाचे मंजूरीचे काम प्रगतीपथावर कन्नड - चाळीसगाव औट्रम घाट बोगद्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी महामार्ग संघर्ष समिती व गावकऱ्यांचे एक लाख सह्यांचे निवेदन शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी, नीती आयोगाचे अमिताभ कांत यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग चेयरमन यांना दिल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे या बोगदा मंजुरीचे काम प्रगती पथावर आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन