ऐतिहासिक वारसा असणारी पंजाबी भाषा आहे - कुलगुरू डॉ उद्धव भोसले

 पंजाबी भाषेला एैतिहासिक वारसा आहे  : कुलगुरू डॉ. उद्धव भोसले

 नांदेड (टिळकरत्न प्रतिनिधी) : पंजाबी भाषा ही एक महत्वाची भारतीय भाषा आहे. पंजाबी भाषेला एैतिहासिक वारसा आहे. असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले. विद्यापीठातील श्री. गुरु गोबिंदसिंगजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या बेसिक पंजाबी भाषा अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र वितरीत करताना ते बोलत होते.   यावेळी कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, स. किरणजीतकौर, या केंद्राचे समन्वयक डॉ. दीपक शिंदे, उपकुलसचिव व्ही. पी. रामतीर्थे यांची प्रमुख उपस्थिती होती.  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी पुढाकार घेतल्याने श्री. गुरु गोबिंदसिंगजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राच्या वतीने हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला सुरळीत चालवण्याकरिता श्री. सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने सहकार्य केले जाते.  पुढे कुलगुरू डॉ. भोसले म्हणाले की, विद्यापीठातील श्री. गुरु गोबिंदसिंगजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्र जागतिक दर्जाचे होईल व त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्याचे विद्यापीठ प्रशासनाचे प्रयत्न आहेत. या केंद्राचे अभ्यासक्रम दर्जेदार व जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त व्हावेत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन