मराठवाड्यात 20 ऑक्टोबर पासून कॉलेज सुरू होणार

२० ऑक्टोबरपासून महाविद्यालये नियमित सुरु होणार 


 नांदेड (टिळक रत्न प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालये, विद्यापीठ परिसरातील सर्व शैक्षणिक संकुले, लातूर व परभणी येथील उपपरिसर, हिंगोली येथील न्यू मॉडेल डिग्री कॉलेज आणि किनवट येथील कै. श्री. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्रातील शैक्षणिक वर्ग दि. २० ऑक्टोबर,२०२१ पासून सुरु करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निर्देशित केल्याप्रमाणे काही नियम व अटीचे पालन करून महाविद्यालयातील वर्ग नियमित सुरु करण्यात येणार आहेत. १८ वर्षावरील विद्यार्थी ज्यांनी कोव्हीड-१९ लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तेच विद्यार्थी/ विद्यार्थिनी विद्यापीठ किंवा महाविद्यालयात उपस्थित राहू शकतील. ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही त्यांच्यासाठी महाविद्यालयाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही शासनाकडून देण्यात आलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी कोव्हीड-१९ लस घेतलेली नाही त्यांच्या करिता विद्यापीठाने, संबंधित संस्थेच्या प्रमुख किंवा महाविद्यालयाच्या प्राचार्य यांच्या मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करून घ्यावे, तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे, असेही महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत कळविण्यात आलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन