प्रत्येक 18 वर्षे पूर्ण केलेल्या अनाथ मुलांना हक्काचे घर,कुटुंब मिळायला हवे-श्रीकांत भारतीय

अठरा वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक अनाथ मुलाला हक्काचे घर, कुटुंब मिळाले पाहिजे : - श्रीकांत भारतीय 


औरंगाबाद (टिळक रत्न प्रतिनिधी): प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमालाने ह्या वर्षी 22 व्या वर्षात पदार्पण केले आहे. व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प ' अनाथ ? नव्हे स्वअनाथ ' या विषयावर तर्पण फाउंडेशन चे सीईओ तथा भारतीय जनता पार्टी चे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी विचार मांडले. भारतात देशांमध्ये अनाथ ही संकल्पना ब्रिटिश काळापासून मोठ्या प्रमाणात रुजविल्या गेली, तत्पूर्वी इतिहासामध्ये असणार्‍या प्रत्येक व्यक्तीला एक कुटुंब होते राजाश्रय होता, त्यामुळे तो व्यक्ती कधी अनाथ राहिला नाही आणि त्यांचे पालकत्व स्वीकारल्या जात होते, परंतु मागील दोनशे वर्षांपासून अनाथांची समस्या खूप मोठ्या प्रमाणात जाणवायला लागली,सध्या हयात असणारा कायदा हा वयाच्या अठरा वर्षापर्यंत अनाथ मुलांना बालगृहात ठेवण्याची परवानगी देतो परंतु त्यानंतर मात्र त्या व्यक्तीची कुठलीही व्यवस्था नसते ,त्याला पालक नसतात त्यांची स्वतंत्र ओळख नसते आपल्या देशामध्ये बाहेर देशातून आलेल्या घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना आधार कार्ड, राशन कार्ड ,पॅन कार्ड, मिळत होते,परंतु आपल्या देशात असणाऱ्या अनाथ मुलांना कुठलेही सरकारी कागदपत्रे मिळत नव्हती हीच मोठी शोकांतिका होती, यावर मात्र भारतीय जनता पार्टी च्या सरकारने आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने अनाथांसाठी सरकारी शासकीय ओळख मिळवून देणारे कागदपत्रे मिळण्यासाठी पाठपुरावा केला. आज त्यांना आधार कार्ड, राशन कार्ड ,पॅन कार्ड मिळत आहे. तसेच शासकीय सेवेमध्ये खुला प्रवर्गातुन अनाथांसाठी एक टक्का आरक्षण फडणवीस सरकारने दिले, त्यामुळे यापुढे अनाथ असणारी मुले सरकारी सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात यापुढे दिसतील , मागील सत्तर वर्षांपासून हया प्रश्नाला कुणी गांभीर्याने घेतले नव्हते, आणि कुणाला ही समस्या महत्त्वाची वाटली नाही,परंतु देवेद्र फडणवीस सरकारने व महिला व बाल विकास खात्यांतर्गत आणि बालक बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत याचा सतत पाठपुरावा केल्यामुळे आज अनाथ मुलांना शासकीय नोकरीत खुल्या प्रवर्गातून एक टक्का आरक्षण उपलब्ध झाले. त्या आरक्षणामुळे आज आपल्यासमोर नारायण दत्ता इंगळे नावाचा मुलगा वन खात्यामध्ये क्लास वन या पदावर आज बसलेला दिसतोय. तसेच अमृता करवंदे नावाची मुलगी शासकीय सेवांमध्ये आज या आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरीला लागली , समाजहित व जनहिताचे कल्याणकारी निर्णय घेणारे सरकार जेव्हा असते तेव्हा खऱ्या अर्थाने समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात असे श्रीकांत भारतीय म्हणाले. त्यासाठी त्यांनी तर्पण फाउंडेशन स्थापन केली असे देखील श्रीकांत भारतीय यांनी यावेळी सांगितले. तर्पण फाउंडेशन च्या वतीने त्यांनी मागील दोन वर्षात कोरोणा काळामध्ये केलेले कार्य व तर्पण फौंडेशनचा उद्देश सांगितला. या वेळेस बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रा व देशातील प्रत्येक अनाथ मुला-मुलीला हक्काचे घर व कुटुंब मिळाले पाहिजे हा तर्पण फाउंडेशनच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे असे ही त्यांनी सांगितले. यावेळी श्रीकांत भारतीय म्हणाले समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो, समाजप्रबोधनासाठी आम्ही तर्पण फाउंडेशन म्हणून काम करतो,अनाथ मुलामुलींना एक हक्काचे कुटुंब मिळाले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला कुणीतरी पाठीराखा असला पाहिजे या उदात्त हेतुने आज आम्ही समाजामध्ये कार्य करत आहोत असे श्रीकांत भारतीय यावेळी म्हणाले .व्यासपीठावर अनाथ आरक्षणातील पाहिले अधिकारी व प्रमुख सत्कारमूर्ती नारायण दत्ता इंगळे यांनी त्यांचा संघर्षमय जिवन प्रवास, बालपणापासून त्यांना आलेला अनुभव व संघर्ष त्यांनी भाषणामधून मांडला , त्यांनी त्यांच्या जीवनाचे ध्येय हे सेवा असल्याचे ही सांगितले. अनाथ मुला-मुलींना मुख्य धारेमध्ये सामावून घेण्यासाठी जे जे करावे लागेल ते आम्ही सर्व करणार आहोत तसेच शासकीय सेवेतील क्लास वन या पदापर्यंत पोहचण्या साठी,प्रत्येक जीवनातील टप्प्यावर येणाऱ्या अडचणी समाजातील सन्माननीय व्यक्तींच्या मदतीमुळे व मार्गदर्शनामुळे सोडवता आल्या व त्यामुळे मी समाजाचे देणे लागतो असे देखील ते यावेळी म्हणाले, येणाऱ्या अडचणी आणि वेळोवेळी समाजातील लोकांनी केलेल्या मदतीचा त्यांनी आवर्जून उलेख केला, समाजामध्ये दानशूर व मदत करणारे खूप चांगले लोक असतात या सर्व लोकांमुळे आज आपले समाज संस्कृती टिकून आहे, अनेक वाईट प्रवृत्ती आपल्या समाजातुन नष्ट झाल्या पाहिजेत या साठी आपण सर्वांनी मिळून कार्य केले पाहिजे असे ही नारायण इंगळे यावेळी बोलताना म्हणाले. मराठवाडा युवक विकास मंडळाचे सचिव व्यंकटेश कमळू प्रास्ताविकात बोलताना असे म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित मराठवाडा युवक विकास मंडळ ही संस्था अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या पूर्व कार्यकर्त्यांचे संघटन आहे. राष्ट्रहिताचे काम करण्यासाठी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते सदैव तत्पर असतात, मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे व आठयातर तालुके अशा प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते मराठवाडा युवक विकास मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असतात.'जागर लसीकरणाचा' हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविल्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण गतिमान गतीमान झाले. मराठवाडा युवक विकास मंडळाने कोरोणा काळा मध्ये केलेले कार्याचा ही त्यांनी उलेख केला. त्या मध्ये रूग्नाना जेवण पुरवणे,अडचणीच्या काळात असणाऱ्या पेशंटच्या नातेवाइकांना हॉस्पिटल ची मदत उपलब्ध करून देणे,या प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम मराठवाडा युवक विकास मंडळाने केले असे सांगितले. मराठवाडा युवक विकास मंडळाचे पूर्व अध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी, मिलिंद पोहणेरकर,केशव पारटकर, प्रवीण घुगे यांच्या कार्याचा मंडळाच्या वाटचाली बाबत गौरवपूर्ण उल्लेख केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदेश सोनवणे यांनी केले तर प्राची खोत यांच्या पसायदानाने नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन