मराठवाडा युवक विकास मंडळ आयोजित स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमाला

 मराठवाडा युवक विकास मंडळ आयोजित स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमाला 



औरंगाबाद (प्रतिनिधी) : मराठवाडा युवक विकास मंडळ आयोजित स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमाला वर्ष 22 वे औरंगाबाद येथे दिनांक 16 ,17 व 18 ऑक्टोबर 2021 रोजी स्व.गोविंदभाई श्रॉफ सभागृह, स.भु.शिक्षण संस्था परिसर,स.भु.शहर बस स्थानक जवळ,औरंगाबाद येथे संपन्न होत आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या भावनेने व सामाजिक प्रबोधन करण्याच्या हेतूने मराठवाडा युवक विकास मंडळा च्या वतीने गेल्या 21 वर्षापासून स्व. प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमाला आयोजित करीत आहोत,या व्याख्यानमालेत सर्व स्तरातून दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यंदा व्याख्यानमालेचे हे 22 वे वर्ष आहे. व्याख्यानमालेत आज पर्यंत विविध विषय हाताळण्या साठी प्रदेश व राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध वक्ते लाभले आहेत. रा. स्व.संघाचे दत्तात्रेयजी होसबळे,गोपीनाथराव मुंडे,नितीन गडकरी,महाराष्ट्राचे चे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,सुधीर मुनगंटीवार,चंद्रकांत दादा पाटील , स्व.बिंदुमाधव जोशी, प्रशांतजी हरताळकर, तरुण विजय ,द.मा. मिरासदार,शेषेराव मोरे, गोविंदाचार्य , मिलिंद मराठे,सुब्रमण्यम स्वामी, व्ही.एम.पाटील निवृत्त ले.ज. , विवेक घळसासी, सुरेश चव्हाणके , जोगेंद्रसिह बिसेन, अरुणजी , कॅप्टन स्मिता गायकवाड,जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर , रामचंद्र देखणे, कवी इंद्रजीत भालेराव,श्याम जाजू, विनायक गोविलकर , विश्वंभर चौधरी ,शरदभाऊ कुलकर्णी, विनय सहस्त्रबुद्धे, माधव भंडारी , भिकुजी दादा ईदाते, ब्रिगेडियर हेमंत महाजन, अनिलजी बोंडे, शिक्षणतज्ञ अतुलजी कोठारी आदी वक्त्यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले आहेत.व्याख्यानमालेचे उदघाटन दि.16 ऑक्टोबर रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.ना.डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात येणार असून यावर्षीच्या व्याख्यानमालेत पहिले पुष्प: शनिवार दि. 16/10/2021 वेळ सायं.6वाजता. वक्ते: सुनीलजी देवधर ,राष्ट्रीय सचिव- भारतीय जनता पार्टी. विषय : जागतिक दहशतवाद आणि भारत पुष्प दुसरे: रविवार दि.17/10/2021वेळ सायं.6वाजता वक्ते: मयुरेश प्रभुणे, खगोलशास्त्र व हवामान शास्त्राचे अभ्यासक विषय: बदलत्या हवामानाचे आव्हान पुष्प तिसरे: सोमवार दि.18/10/2021वेळ,सायं. 6 वाजता वक्ते:श्रीकांतजी भारतीय, संस्थापक, तर्पण फाउंडेशन आणि प्रदेश सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी. विषय: अनाथ? नव्हे स्वनाथ. स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमाला उपरोक्त दिनी स्व.गोविंदभाई श्रॉफ सभागृह, स.भु.शिक्षण संस्था परिसर,स.भु.शहर बस स्थानक , औरंगाबाद .येथे होणार असून व्याख्यानमालेस देवगिरी नागरी सहकारी बँकेचे सौजन्य लाभले आहे. व्याख्यानमाला ऑनलाइन पद्धतीने थेट प्रक्षेपित होणार आहे. प्रक्षेपण पाहण्यासाठी दि.16,17 व 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक 6.00 वाजता https://www.youtube.com/channel/UC4kV0lvxJQA0c08qBpx56Bw ह्या संकेत स्थळी भेट देऊन पाहता येईल त्याच प्रमाणे समस्त नागरिक,अभ्यासू व्यक्ती, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या संधीचा लाभ प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून घ्यावा असे आवाहन मराठवाडा युवक विकास मंडळाचे अध्यक्ष श्री मनोज शेवाळे व सचिव व्यंकटेश कमळू यांनी केले आहे.पत्रकार परिषदेला या वेळी मराठवाडा युवक विकास मंडळाचे पूर्व अध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी , सहसचिव डॉ.राम बुधवंत उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन