दीपावलीला फटाके विक्रीसाठी लागणाऱ्या परवान्यासाठी अर्ज करावे

दिपावली सणाच्यानिमित्ताने फटाके विक्रीसाठी लागणाऱ्या परवान्यासाठी अर्ज करावे


परभणी, दि.04 (टिळक रत्न ):- नोव्हेंबर 2021 रोजीपासून दिपावली सण साजरा करण्यात येणार आहे. दिपावली सणानिमित्त इच्छुक व्यक्तींना पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी फटाके विक्रीसाठी तात्पुरते फटाके परवाने देण्यासंबंधी विस्फोटक अधिनियम 2008 मधील विहीत नमुन्यातील अर्ज मंगळवार दि.5 ऑक्टोबर 2021 रोजीपर्यंत स्विकारले जाणार आहेत. तरी जिल्ह्यात फटाके दुकाने लावण्यास इच्छुकांनी आपले अर्ज मुदतीत सादर करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे. फटाक्याच्या परवान्यासाठी प्रत्येक फटाके विक्री दुकानातील अंतर हे कमीत कमी तीन मिटरचे असावे. दुकाने मोकळ्या जागी व्यवस्थित कोणत्याही प्रतिबंधित इमारतीपासून 50 मीटरपेक्षा कमी अंतरावर नसावीत. प्रत्येक फटाके विक्री दुकानातील स्टॉक मर्यादा जास्तीत जास्त 100 किलो राहील. पोलिस अधिक्षकांचे कायदा व सुव्यवस्था, अर्जदाराची वर्तणूक आणि दुकानाचे बाबतीत अर्जदाराने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले किंवा कसे याबाबत सर्वकष अहवाल. महाराष्ट्र नगर पंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 चे कलम 281 अन्वये संबंधित महानगरपालिका व नगरपालिका यांचा परवाना. संबंधित तहसिलदार यांचे फटाक्याच्या दुकानासाठी अर्जदाराने अर्जासोबत सादर केलेले रहिवाशीबाबत पुराव्याची खातरजमा करुन अर्जदार नमुद पत्त्यावर राहतात किंवा कसे? याबाबत कळविले आहे

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन