राष्ट्रीय टपाल सप्ताह निमित्ताने परभणी मुख्य डाकघर येथे रक्तदानं शिबिर सम्पन्न

राष्ट्रीय टपाल सप्ताह निमित्त परभणी मुख्य डाकघर येथे रक्तदान शिबीर संपन्न




परभणी (टिळकरत्न प्रतिनिधी):-. राष्ट्रीय टपाल सप्ताह निमित्ताने परभणी मुख्य डाकघर येथे रक्तदान शिबिर 16 ऑक्टोबर रोजी संपन्न झाले. शिबीराचे ऊद्घाटन लाईफ लाईन हाँस्पपीटलचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डाँ.ज्ञानेश्वर हरबक(माऊली)यांचे हस्ते दीपप्रज्वलन व म,गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन झाले .या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन लाईफ लाईन हाँस्पीटलचे डाँ.गजानन कानडे हे होते.या शिबीरा मध्ये हुजुर साहेब रक्तपैढीचे संचालक श्री ज्ञानेश्वर खटींग यांचे सहकारी उपस्थित होते .या कार्यांयक्रमाची सुरुवात डाँ.ज्ञानेश्वर माऊली , डॉ्.गजानन कानडे व श्री.खतींग यांचा पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले . या प्रसंगी शिबीरास मार्गदर्शन करतांना डाँ.माऊली सरांनी रक्तदानाचे महत्व पटवुन सांगितले .प्रस्तावीकात परभणी डाकविभागाचे सहा.डाकअधिक्षक श्री विनोद कुलकर्णी यांनी शिबीराचे महत्व विशद करतांना आज सद्यपरिस्थित रक्तदानाची गरज का? हे रक्ताच्या तुटवड्याच्या आकडेवारी नुसार उपयुक्त माहीती सांगितली .रक्तपेढीचे संचालक माऊली खटींग यांनी संबोधीतकरतांना टपाल खात्याचे आभार मानले.या प्रसंगी सहा.डाक अधिक्षक मुख्यालय श्री. मोहमद खदीर साहेब ,पोष्टमास्तर अय्युब साहेब आणि टपाल कर्मचारी आणि ईच्छुक रक्तदाते उपस्थित होते.या शिबीरामध्ये एकुन 41 रक्तदात्यांनी रक्तदान करुन रक्तदान शिबीर यशस्वी केले.या शिबीरास परभणीचे समाजसेवक तथा साप्ताहीक टिळक रत्न चे संपादक श्री मंदार कुलकर्णी यांनी देखील स्वतःहा रक्तदान करुन शिबीरास शुभेच्छा दिल्या.या शिबीरास बहुसंख्य टपाल कर्मचारी उपस्थित होते.शेवटी श्री.तिळकरी ,खजिनदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन