मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत - आमदार अंबादास दानवे

ठाकरे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी - आमदार अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन साधला संवाद 




औरंगाबाद : शेतकरी बांधवांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही, "ठाकरे सरकार" कायम आपल्या पाठीशी भक्कम पणे उभे आहे असे आश्वासन देत शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा दिला. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची दखल घेत नुकतेच महाविकास आघाडी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना १० हजार कोटीची मदत जाहीर केली आहे. यानिमित्ताने शिवसेना औरंगाबादच्यावतीने जिल्ह्यात तीन दिवस शेतकरी संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या शेतकरी संवाद दौरा च्या माध्यमातुन जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे व आमदार उदयसिंह राजपूत यांनी आज (दि. १६ ) रोजी कन्नड तालुक्यातील टापरगाव व जैतापूर या गावातील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला या संवादात महाविकास आघाडी सरकारच्या वतीने आपल्याला अर्थसाह्य म्हणून मदत जाहीर केली आहे, याची माहिती दिली. व शेतकरी कुटुंबांना धीर दिला. या दरम्यान शेतकऱ्यांनी विशेषता ठाकरे सरकारचे मनापासून खूप खूप आभार मानले. या संवाद दौराप्रसंगी त्यांच्यासमवेत उपजिल्हाप्रमुख अवचित वळवळे तालुकाप्रमुख केतन काजे,राजू वरकड , तालुका संघटक डॉ. अण्णा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उपतालुकाप्रमुख शिवाजी थेटे, संजय मोटे, डॉ. सदाशिवराव पाटील, महिला आघाडी उपजिल्हा संघटक हर्षलीताई मुठ्ठे , तालुका संघटक दीपालीताई मोहिते विभागप्रमुख दीपक नाना बोडखे, पंचायत समिती सदस्य गोकुळ गोऱ्हे, उपविभागप्रमुख भारत हरदे, शाखाप्रमुख गणेश भिंगार, उपसरपंच अशोक भिंगारे, युवा सेना अक्षय शिरसाट, सनी ठोले, विकास नांगुर्दे, आकाश उबाळे, अनंता पवार, किशोर पवार, शाखा प्रमुख चांगदेव सावडे, ग्रामसेवक कल्पनाताई गोखले आदी गावकरी नागरिक उपस्थित होते.
x

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन