विधान परिषदेसाठी भाजपकडून संजय केनेकर यांना उमेदवारी

 विधान परिषदेसाठी भाजपकडून संजय केनेकर यांना उमेदवारी ! 



औरंगाबाद (टिळक रत्न प्रतिनिधी) : आगामी औरंगाबाद महापालिका निवडणूक आणि शिवसेनेशी थेट होणारी लढत पाहता भाजपने डाॅ. भागवत कराड यांच्यानंतर संजय केणेकर यांना बळ देण्याचे ठरवले आहे. केनेकर यांना विधानपरिषदेचे निवडणूक लढवणार आहेत. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. १० डिसेंबर रोजी मतदान तसेच १४ रोजी मतमोजणी होणार आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकास आघाडी व भाजप यांच्यात रस्सीखेच पहायला मिळणार आहे. भाजपकडून या निवडणूकीसाठी औरंगाबाद भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. संजय केनेकर यांना उमेदवारी द्यावी, अशी शिफारस महाराष्ट्र प्रदेश भाजपातर्फे पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीला केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा करून संजय केनेकर यांचे नाव महाराष्ट्र भाजपतर्फे निश्चित करून शिफारस केली आहे. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अनुमतीने केंद्रीय निवडणूक समितीकडून संजय केनेकर यांची उमेदवारी निश्चित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक अर्ज भरण्याची मुदत १६ नोव्हेंबर आहे. केंद्रीय समितीकडून नाव निश्चित झाल्यावर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लवकरच अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे देखील म्हटले आहे. विधान परिषदेच्या सहा जागांमध्ये मुंबई, कोल्हापूर, धुळे, अकोला, नागपूरचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा पाहायला मिळणार आहे. आगामी महापालिका निवडणूक आणि त्यात शिवसेनेशी थेट होणारी लढत पाहता भाजपने डाॅ. भागवत कराड यांच्यानंतर संजय केणेकर यांना बळ देण्याचे ठरवले आहे. या माध्यमातून बीजेपी ने ओबीसी चा पत्ता टाकली असल्याचे देखील चर्चा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. संजय केणेकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड-दोन वर्षात भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार व जिल्ह्यातील शिवसेनेच्या विरोधात आक्रमक आंदोलनी केली आहेत. शहरात भाजपची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेल्या प्रयत्नांना एक प्रकारे वरिष्ठांकडून पाठबळ आणि शाबसकी म्हणून त्यांच्या उमेदवारीकडे पाहिले जात आहे. महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता केनेकर यांचा विजय सोपा वाटत नसला तरी एखादा चमत्कार घडून केनेकर आमदार होतात का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन