निवृत्तीवेतनधारकांनो हयात प्रमाणपत्र देण्यासाठी धावाधाव करू नका 15 डिसेंबर 2021 पर्यंत वेळ हातात आहे

निवृत्तीवेतनधारकांनो हयात प्रमाणपत्र देण्यासाठी धावाधाव करू नका, 15 डिसेंबर 2021 पर्यंत वेळ हातात आहे


परभणी, दि. 11 (टिळक रत्न) :- काही दिवसाखाली अनेक प्रसिद्ध वृत्तपत्र मध्ये बातमी छापून आली होती की निवृत्त वेतन धारकांनी 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत आपापले जीवन प्रमाण पत्र (हयात प्रमाण पत्र) पेन्शन मिळते त्या बँकेत जाऊन सही करावी ह्या वृत्तामुळे निवृत्ती वेतन धारकांमध्ये एकच धावपळ सुरू झाली जिल्ह्यातील पोस्ट विभाग कडे पोस्टमनकडे तसेच सी एस सी केंद्रावर जाऊन पेन्शन धारक प्रमानपत्र सादर करण्याचा कामाला लागली अनेक निवृत्तीधारकांनी आपापल्या बँकेत कसेबसे पोहचून प्रमाणपत्र सादर केले एकंदरीत त्या बातमीमुळे पेन्शन धारका मध्ये प्रमाणपत्र सादर करण्यासाठी धावपळ  होत असल्याचे चित्र दिसून आले आहे तरी सर्व पेन्शन धारकांनी अशी धावपळ थांबवावी आपल्या कडे 15 डिसेंबर 2021 पर्यंत वेळ आहे कसल्याही प्रकारे त्रास करून घेऊन प्रमाण पत्र देण्यासाठी कुठंही रांगा लावू नका निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी दि.15 डिसेंबर 2021 पर्यंत हयात प्रमाणपत्रे दाखल करणे आवश्यक आहे. निवृत्तीवेतनधारकांचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेतील यादीतील आपल्या नावासमोर सही करुन हयातीचा दाखला देवू शकतात तसेच जीवनप्रमाण या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीनेही हयातीचा दाखला सादर करु शकतील. एसबीआय बँकेच्या शाखेत ऑनलाईन पध्दतीने हयातीचा दाखला दिल्याशिवाय यादीतील नावासमोर स्वाक्षरी करता येणार नाही असा अनेक निवृत्तीवेतनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तरी ऑनलाईन हयातीचा दाखला देणे सक्तीचे नाही तसेच याबाबत एखादी बँक सक्ती करत असेल किंवा रक्कम आकारत असेल तर संबंधित बँकेचे व्यवस्थापक अथवा जिल्हा कोषागार कार्यालयात तक्रार नोंदवावी. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, परभणी यांनी केले आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन