एस टी कामगारांनो भरघोस वेतनवाढ केली आहे उद्यापासून कामावर या...विलिनीकरण चे पुढे पाहू

वेतनवाढ केली ...उद्या पासून कामावर या....विलीनीकरनाचे पुढे पाहूया..
 एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ४१% वाढ करण्याचा सरकारचा निर्णय !!


 परिवहन मंत्री अनिल परब यांनी नवीन बदल केलेले समोर ठेवले ते पुढील प्रमाणे १२००० रूपयांवर काम करत असलेल्या १ ते १० वर्ष अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये पगारवाढ. •११ ते २० वर्ष अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना ४ हजार रुपये पगारवाढ •आज ज्या कर्मचाऱ्यांना १७ हजार पगार भेटतोय त्यांचा पगार २४ हजार रुपये होणार. एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ता मिळणार. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याला १० तारखेच्या आत होणार. सर्व निलंबित कर्मचाऱ्यांचं निलंबन आणि सेवा समाप्ती रद्द केली जाणार. महामंडळाचं उत्पन्न वाढलं तर ड्रायव्हर आणि वाहकांना इन्सेंटिव्ह मिळणार. उद्या सकाळी ८ वाजल्यापासून कामावर रूजू होण्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे आवाहन. एसटी महामंडळाच्या इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी पगारवाढ करणारं हे पहिले सरकार आहे

राहिला प्रश्न विलिनीकरण चा तर समिती अहवाल येईल त्याप्रमाणे पाहू असेही ते पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले

यावर कामगारांचे मत असे आले की आमची प्रमुख मागणी विलिनीकरण ची आहे विलिनीकरण झाले तर बाकी आपोआप मिळणारच की येऊ द्या समितीचा अहवाल तो पर्यंत सम्प मागे न घेण्याचा मानस यावेळी व्यक्त केला जात आहे

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन