परभणी येथे 7 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

 परभणी येथे 7 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन




परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी) - परभणी येथे 7 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.परभणी येथे सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा- 2023 चे आयोजन जिंतूर रोडवरील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर 7 मे रोजी करण्यात आले आहे. यामध्ये 35 जोडपे विवाहबद्ध होणार असून सर्व जोडप्याना आयोजक समिती द्वारे 50000 रु पर्यंत चे संसारउपयोगी साहित्य व 20000 धनादेश दिला जाणार आहे आणि सर्व तयारी व नियोजन मध्ये केवळ परभणीतील धर्मदाय संघटना संस्था सहभागी असून कोणातही शासन निधी ह्याकरिता घेण्यात आलेला नाहीये तसेच सदरील सोहळ्यास अंदाजे 5000 नागरिक उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगितले गेले आहे .या विवाह सोहळ्याविषयी विस्तृत माहिती अ‍ॅड किरण दैठणकर यांनी 5 मे रोजी पत्रकार परिषद द्वारे दिली पत्रकार परिषदेस  कृषिभूषण कांतराव काका देशमुख, अ‍ॅड. किरण दैठणकर, भीमराव वायवळ, शरद लोहट, प्रिया ठाकूर डॉ पवन चांडक, अ‍ॅड प्रमोद सराफ, विठ्ठल शहाणे, मनचक वाघ, अ‍ॅड हनुमान अरसुले, नितीन लोहट, आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन