हिंगोली व नांदेड मध्ये जाणवले भूकंप चे सौम्य धक्के...परभणी सुरक्षित

हिंगोली व नांदेड जिल्ह्यात जाणवले भूकम्पाचे भूगर्भातून आवाजासहित सौम्य धक्के


रवीवार दि 11 जुलै 2021 रोजी सकाळी साडेआठ च्या सुमारास हिंगोली व नांदेड जिल्ह्यात भूकम्पाचे सौम्य हादरे बसले भूगर्भातून आवाजसहित हादरे बसल्याचे नागरिकांनी सांगितले कळमनुरी तालुक्यातील नांदापूर पोतरा देवरा वारंगा फाटा दांडेगाव जवळा पांचाळ वडगाव ह्या परिसरात हादरे जाणवले वसमत औंढा कळमनुरी हिंगोली शहर व नांदेड मध्ये हादरे जाणवले तसेच ह्याबाबत तहसीलदार ह्यांनी लातूर भूकम्प मापक केंद्राशी सम्पर्क केल्याचे सांगितले आहे. सदरील भूकम्पा मुळे सध्या कोणतीही जीवित हानी झालेली नसल्याचे कळविले आहे.  सदरील हिंगोली व नांदेड ला हादरे बसल्याने बाजूचा जिल्हा परभणी मध्ये नागरिकांतून घबराहट दिसून आल्याने परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर ह्यांनी सांगितले की बाजूच्या जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असले तरी परभणी जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी सौम्य धक्के जाणवले नाही किंवा हादरे देखील झालेले नाहित नागरिकांनी अजिबात घाबरू नये असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केली आहे. रविवारी यवतमाळ हिंगोली नांदेड या परिसरात काही धक्के जाणवले आहेत मात्र परभणी जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी अजून पर्यंत धक्के जाणवले याची माहिती प्राप्त झालेली नाही लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन