अनेक तासापासून लाईट बंद ठेवली जात आहे विचारायचे कोणाला

तक्रार करायची कुठे? पावसाळ्यात वीज खंडित झाल्यास महावितरणने संपर्क क्रमांक जाहीर करण्याची नागरिकांची मागणी

परभणी ( टिळक रत्न प्रतिनिधी ) :- आता सध्या परभणीतील अनेक प्रभागात थोडे जरी वारे आले आणि पाऊसाचे पाणी सुरू झाले की थेट विद्युत पुरवठा खंडित होतो हे नेहमीचेच झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाळ्यात वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने परभणीतील नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागते. वीज खंडित झाल्यानंतर नेमकी तक्रार कुठे करावी किंवा माहिती कोणाकडून घ्यावी, हे नागरिकांना समजत नाही. अनेकदा महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोन लागत नसल्याने नागरिकांचा रोष वाढतो. या पार्श्वभूमीवर, महावितरणने त्यांचे फ्युज कॉल सेंटरचे नंबर आणि इतर जबाबदार कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक तातडीने सार्वजनिक करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

​अधिकाऱ्यांकडून वेळेवर माहिती न मिळाल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते. वीज गुल झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण, परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि महिलांचे अतोनात हाल होतात. विशेषतः पाणीपुरवठ्याच्या वेळेसच वीज गेल्याने पाणी साठवण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे महावितरणने नागरिकांसाठी अधिक सक्षम संपर्क व समन्वय यंत्रणा उभारण्याची गरज आहे.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या:

  • अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नंबर जाहीर करा: विभागनिहाय कनिष्ठ अभियंता, वायरमन व लाईनमन यांचे मोबाईल क्रमांक तातडीने सार्वजनिक करावेत, जेणेकरून स्थानिक पातळीवर संपर्क साधणे सोपे होईल.
  • फ्युज कॉल सेंटर आणि संपर्क फलक: प्रत्येक उपकेंद्र (सबस्टेशन) स्तरावर फ्युज कॉल सेंटरचे कार्यरत नंबर आणि इतर संपर्क क्रमांकांचे मोठे फलक लावण्यात यावेत.
  • २४ तास नियंत्रण कक्ष: २४ तास कार्यरत असणाऱ्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाची माहिती आणि क्रमांक सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवावेत.
  • डिजिटल माहिती व हेल्पलाईन: वीज खंडित झाल्यास किंवा पूर्वकल्पना द्यायची असल्यास एसएमएस (SMS) किंवा व्हॉट्सॲप संदेशाद्वारे माहिती द्यावी. तसेच प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करावी.
  • पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती व समन्वय: पावसाळ्याच्या काळात वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर आणि धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करून घ्यावी. तसेच महावितरण आणि महानगरपालिका यांच्यात प्रभावी समन्वयासाठी समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.

Comments

Popular posts from this blog

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला