कोरोनाच्या नव्या लाटेशी सामना करण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज

कोरोनाच्या नव्या लाटेशी सामना करण्यास मनपा सज्ज, मनपा आयुक्तांनी घेतला रुग्णालयांचा आढावा 




 परभणी, दि 27 चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यानंतर संपूर्ण देशभरात प्रशासन सतर्क झाले असून परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने देखील नवीन लाटेशी सामना करण्यासाठी कोविड परिस्थितीशी सामना करण्‍यासाठी पूर्व तयारी म्‍हणून आज दिनांक २७.१२.२०२२ रोजी परभणी शहर महानगरपालिकेच्‍या आयुक्‍त तथा प्रशासक तृप्ती सांडभोर व नोडल अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहूल गिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास जगताप यांनी कोव्हिड डेडिकेटेड हॉस्‍पीटलची पाहणी केली. पाहणी मध्‍ये कोव्हिड डेडिकेटेड हॉस्‍पीटल मधील उपाययोजनांची पाहणी केली. आज रोजी परभणी शहरात महापालिकेच्‍यावतीने कल्याण मंडमप् याठिकाणी, तसेच लाईफ लाईन हॉस्‍पीटल, स्‍वाती क्रिटीकेअर हॉस्‍पीटल व सुर्या हॉस्‍पीटल येथे कोव्हिड केअर सेंटर उभारण्‍यात आल्‍याची माहिती आयुक्‍त्त तृप्‍ती सांडभोर यांनी दिली. यापैकी महानगरपालिके मार्फत कल्‍याणमंडपम् येथे उभारण्‍यात येत असलेल्‍या कोव्हिड केअर सेंटर व Oxygen Plant ची पाहणी करण्‍यात आली. कल्‍याणमंडपम् येथील कोव्हिउ केअर सेटर येथ ३०० बेडची व्यवस्था करण्‍यात आलेली असून सद्यस्थितीत ५० बेड कार्यरत ठेवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी ०३ वैद्यकिय अधिकारी व इतर १५ आरोग्य कर्मचा-यांची व्यवस्‍था करण्‍यात असून Oxygen Plant कार्यन्‍वीत असल्‍याची खात्री करण्‍यात आली. Oxygen Plant च्‍या देखरेखी करीता विद्युत अभियंता यांची नियुक्‍ती करण्‍याच्‍या सुचना वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ. कल्प‍ना सावंत यांना सुचना केल्या. यावेळी कल्‍याणमंडपम् येथे अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यन्वित असल्‍याचे प्रात्‍यक्षीक अग्निशमन अधिकारी दिपक कानोडे व डॉ. मृन्‍मयी मोरे यांनी करून दाखवले. त्यानंतर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लाईफ लाईन हॉस्पीटल (DCHC) येथे भेट देण्‍यात आली. भेटी दरम्‍यान डॉ. रामेश्वर नाईक यांनी हॉस्पीटल मध्ये कोव्हिड रूग्णांवर उपचारासाठी केलेल्या तयारीची माहीती दिली. यामध्ये 2 CU Bead, Resolution Beds व Ventilators, Oxygen व औषधी उपलब्‍ध ठेवण्‍याच्‍या सुचना प्रशासक तथा आयुक्‍त तृप्‍ती सांडभोर यांनी दिल्‍या. यावेळी डॉ. मस्‍के, डॉ. नाहीद फातेमा, कोव्हिड केअर सेंटर प्रमुख, डॉ. मृन्‍मयी मोरे वैद्यकीय अधिकारी, शहर कार्यक्रम व्‍यवस्‍थापक गजानन जाधव, अमोल काटोके, निलेश जोगदंड, दत्तात्रय हाके, तपसे, कदम, टाकरस, गऊळकर, कापसे व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन