आता जर सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क/रुमाल न वापरल्यास दंड तर होईलच सोबत सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणल्याचा गुन्हा देखील दाखल होईल-सावधान

टिळक रत्न बातमीचा इम्पॅक्ट प्रशासनाने दिले सक्त कारवाईचे आदेश 

आता जर सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क/रुमाल न वापरल्यास दंड तर होईलच सोबत सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणल्याचा गुन्हा देखील दाखल होईल-सावधान

परभणी (प्रतिनिधी):- टिळक रत्न ने काल दि 27 जून रोजी एक बातमी प्रसारित केली होती की परभणीत छोट्या मोठ्या व्यवसायिक लोकांना मास्क/रुमाल बांधायची एलर्जी आहे की काय असे वृत्त प्रसारित केले होते आज याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने सक्त करवाईचे आदेश जारी केले आहेत

आधी केवळ मनपा च्या वतीने किरकोळ स्वरूपात कारवाई करण्यात येत होत्या आणि मास्क/रुमाल न वापरणाऱ्या लोकांकडून दंड वसूल केला जात होता पण आता गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे यात पोलीस प्रशासन देखील कारवाईत पुढे असणार आहेत 

ज्यात यापुढे कोणीही विना मास्क/रुमाल तोंडावर सार्वजनिक ठिकाणी येईल अशांना पहिले 200 रु व दुसरे वेळी असे वागल्यास 500 रु दंड आनि परत असेच वागल्यास सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणल्याचा कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे 

त्यामुळे आता तरी नागरिकांनी व छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी यापुढे जागरूक राहून सार्वजनिक ठिकाणी मास्क/रुमाल तोंडा वर बांधून ठेवावा मानेवर आथवा हनुवटीवर बांधू नका नसता वरील कारवाईस पात्र रहाल 


Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन