गणेश भक्तांवर सूडबुद्धीने हद्दपारीची कारवाई - गणेश मंडळच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी दिले नुकसानभरपाई पोटी 10 हजार रुपये

गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांचेवर सूडबुद्धी ने हद्दपारी कारवाई केल्याने...अखेर हानीभरपाईपोटी पोलीस-प्रशासनाने गणेश मंडळ कार्यकर्त्यांना दिलेे 10 हजार रुपये !

 नंदुरबार 11 मे (वृत्तसंस्था) :- नंदुरबार येथे गणेशोत्सवाच्या काळात पोलीस प्रशासनाने बोलवलेल्या बैठकीत ‘वेळेत गणेश विसर्जन न झाल्यास थेट गणेश मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारच्या सूचना पोलीस दलाच्या वतीने देण्यात आल्या होत्या यावेळी बैठकीस आलेल्या गणेश उत्सव मंडळाचे काही कार्यकर्त्यांनी पोलिसांनी प्रतिप्रश्न केले  ‘तुम्ही न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करणार असाल, तर त्याचप्रमाणे पहाटे 5 वाजता मशिदींवर वाजणार्‍या अवैध भोंग्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करणार का?’, असा रास्त प्रश्‍न गणेश मंडळे यांनी विचारला होता. त्यावर तत्कालीन नंदूरबारचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हा प्रशासन यांनी सुडबुद्धीने कारवाई करत 77 जणांच्या विरोधात हद्दपारीची कारवाई केली. या अन्याय्य कारवाईच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील आणि मयुर चौधरी यांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर सत्र न्यायालयाने हद्दपारीचा आदेश रद्द केला.  तसेच दोघांनी हानीभरपाईसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका केल्यावर न्यायमूर्ती नलावडे आणि न्यायमूर्ती सोनावणे यांच्या खंडपिठाने पोलीस अन् प्रशासन यांना दोषी ठरवून 10 हजार रुपयांची हानीभरपाई देण्यास सांगितले; मात्र ती हानीभरपाईची रक्कम वेळेत जमा न केल्याने पुन्हा उच्च न्यायालयात याविषयी अवमान याचिका दाखल करण्यात आली. त्यावर न्यायालयाच्या आदेशाने 10 हजार रुपयांची भरपाईची रक्कम दोघा गणेश मंडळाच्या कार्यकर्तेना मिळाली आहे
सदर अन्याय्य हद्दपारीच्या विरोधात लढण्यासाठी डॉ. नरेंद्र पाटील आणि श्री. मयुर चौधरी यांना हिंदु विधीज्ञ परिषदेचे वकील सुरेश कुलकर्णी उमेश भडगावकर यांनी मोलाचे साहाय्य केले. तसेच न्यायालयात अभ्यासपूर्ण लढा देऊन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून दिला. मंडळाच्या पदाधिकारी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन