परभणीत छोट्या-मोठया व्यावसायिकांना मास्कची ऍलर्जी ?

परभणीत छोट्या-मोठया व्यावसायिकांना मास्कची ऍलर्जी आहे का ?
परभणी (प्रतिनिधी):- कोरोना विषाणू संसर्ग प्रसार थांबवण्यासाठी प्रशासनाने सर्व नागरिकांना घराबाहेर पडताना तोंडावर मास्क अथवा रुमाल बांधण्याची सक्ती केली आहे .
मात्र आज सुद्धा बाजारात अनेक ठिकाणी परभणीतील छोटे मोठे व्यावसायिक तोंडावर मास्क रुमाल न बांधता आपला व्यवसाय आथवा कामे करताना दिसून येत आहेत काही महाभाग ते मास्क हनुवटीवर बांधून ठेवलेले दिसून आले तर काहींनी रुमाल मानेभोवती बांधलेला दिसून आला सॅनिटाईजर बाटली केवळ पाहण्यासाठी अनेक दुकानात अढळून येत नाहीत ते बरेच फळ व भाजी विक्रेते तर चक्क असे म्हणटले की मास्क रुमाल तोंडावर बांधला तर आम्हाला जोरात ओरडून भाजी किंवा फळ विक्री करताना अडचण येते काही तर केवळ नुसता कपडा तोंडावर झाकतात जर आपण मास्क किंवा रुमाल बांधयला सांगितलं तर ह्या अश्या हलगर्जी पणामुळे त्याच्या पासून अथवा त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही एकीकडे परभणी मनपाची प्रशासनाद्वारे सार्वजनिक ठिकाणी मास्क रुमाल न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई सुरू आहे ती पण केवळ देखाव्यापुरती आहे की काय असेच वाटते आहे कारवाई जर खरोखर होत असेल तर हे छोटे मोठे व्यापारी किंवा व्यावसायिक कारवाई करणारे अधिकारी किंवा कर्मचारी यांना कसे काय दिसून येत नाही हे अनाकलनीय आहे
आधी शून्य कोरोना रुग्ण असलेल्या परभणी शहरात मुंबई पुणे येथून आलेल्या लोकांमुळे कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झालेली आहे सरकारने व प्रशासनने सर्वाना प्रत्येक वेळी सांगितले आहे की घरी रहा पण बाहेर विनाकारण पडून कोरोना संसर्ग वाढवण्यासाठी हातभार लावू नका असे  न केल्याने नियम पाळण्यात ढिलाई केल्याने परभणीत कोरोना संसर्ग वाढत आहे मनपा व पोलीस प्रशासनाने 
अश्या सर्व व्यक्तींवर कठोर कारवाई करून यांना घालून देण्यात आलेल्या नियमांची आठवण द्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन