परभणीत फेरफार नक्कल बाबत शेतकरयां मध्ये संभ्रम

परभणीत पीक कर्ज साठी फेरफार नक्कल बाबत शेतकरीवर्गात संभ्रम


परभणी (प्रतिनिधी):- राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यायचे घोषित केले आणि शेतकरी पीक कर्जासाठी बँकेत आपापले पीक कर्ज मागणी अर्ज घेऊन दाखल होत आहेत.
सदरील पीक कर्ज मागणी अर्जात आवश्यक कागदपत्रे जुळवा जुळव करून अर्ज दाखल करावी लागतात ज्यात शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड,सातबारा ,नमुना नं 8 अ ,फेरफार नक्कल, सोबत असल्यास पॅनकार्ड अशी सर्व कागद पत्रे जोडून बँकेत अर्ज करावा लागतो, यात फेरफार नक्कल प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात जावे लागते अर्ज देऊन नककलची मागणी करावी लागते आता शेतकरी तहसील मध्ये गेल्यास तेथील अधिकारी कोरोना चे संसर्ग टाळण्यासाठी गर्दी करू नका असे सांगतात पण ही नक्कल सर्वाना कर्जा करिता आवश्यक आहे तर सर्व शेतकरी लोकांची एकाचवेळी गर्दी होणे सहाजिक आलेच तसेच  तहसील प्रशासनाने थेट आदेश काढला आहे की बँकेने सध्याच्या कोविड काळात कर्ज खातेदारास फेरफार नक्कलकरीता आग्रह करू नये सदरील सर्व खातेदाराची फेरफार नक्कल ची प्रत बँकांना पोहचती करण्यात आल्या आहेत असे नमूद असलेले  न्यायदंडाधिकारी तथा अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीचा आदेशपत्र तहसील अभिलेखा कक्षाच्या प्रवेशद्वारा वर डकवण्यात आले आहेत.
जर ही बाब बँकेला सांगितली तर ते सांगतात की फेरफार नक्कल जोडावेच लागेल यामुळे शेतकरी तहसील मध्ये गर्दी करताना दिसून येत आहेत अशाने सोशल डिस्टनसिंनचा फज्जा उडत आहे 
त्यात शेतकरी आपला फेरफार नक्कल मागणी अर्ज कार्यालयात स्वतःहून शोधून देऊन तो अधिकाऱ्यांना कारवाईस्तव सादर करण्यासाठी धडपडत आहे.
जर प्रशासनाने कळवले आहे की फेरफार बँकेने स्वतः मागणी करून न्यावेत शेतकऱ्यांना पाठवू नये असे असताना शेतकरी फेरफार नक्कल मिळवण्यासाठी संभ्रमित होऊन धडपडत आहे समबंधितांनी याकडे लक्ष देऊन संभ्रम दूर करावा शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन