खरीप हंगामातील पिक कर्ज वाटप बाबत बँकांना आता दररोज ऑनलाईन प्रणाली द्वारे अहवाल सादर करावे लागणार

खरीप हंगामातील पिक कर्ज वाटप बाबत बँकांना आता दररोज ऑनलाईन प्रणाली द्वारे अहवाल सादर करावे लागणार

परभणी (प्रतिनिधी):- खरीप हंगाम 2020 पिककर्ज साठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत करावयाचे पीककर्ज वाटप तसेच महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना बँकांमार्फत करावयाचे कर्ज वाटप याविषयी सहकार आयुक्तालय मार्फत आढावा घेण्यात आला त्यामध्ये परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाना 16626 लक्षाचा लक्षांक उद्दीष्ट देण्यात आले होते त्यात मध्ये 12382 लक्षषांक 74% उद्दिष्ट साध्य केले आहे 
यामुळे आढावा परिषदेच्या आदेशाने असे सांगितले गेले आहे की शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी योजनेचा मिळालेला नाही अश्या शेतकऱ्यांना बॅंकांनी थकबाकीदार न समजता खरीप हंगामामध्ये पिककर्ज पिककर्ज वाटप करावे याकरीता शेतकरी बांधवानी आपल्या खाते असलेल्या बँकेशी सम्पर्क साधावा व पि एम किसन कार्ड करिता अर्ज भरून द्यावा असे आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले होते त्या नंतर 

शेतकरी वर्गाकडून खरीप हंगाम पीक कर्ज करिता बँक कर्मचारी चालढकल करत असल्याचे तक्रारी प्राप्त होऊ लागल्या यामुळे आता असे चालढकल पणा कर्मचारी लोकांनी करू नये व कोणताही शेतकरी वंचीत राहू नये याकरिता ऑनलाईन दररोज बँकेने आढावा द्यायचा आहे प्रकरण किती फाईल मंजूर केल्या किती फाईल नामंजूर केल्या केली कोणते कर्ज प्रकरण का रद्द केले त्याचा गोषवारा दररोज ऑनलाईन पद्धतीने देण्यास प्रशासनाने सक्तीचे केले आहे

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन