भविष्य निर्वाह निधीचे प्राधिकार पत्र खुले करा - शिक्षकांची मागणी

भविष्य निर्वाह निधीचे प्राधिकार पत्र खुले करा - शिक्षकांची मागणी

परभणी, दि. ६ (प्रतिनिधी)- भविष्य निर्वाह निधी चे खात्याचे "बीडीएस" (प्राधिकार पत्र) बंद केल्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यासह सेवा निवृत्तांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे 
 शिक्षकांचे काही घरगुती तातडीचे कामास पैसे लागत असून ते खात्यात शिल्लक असताना देखील केवळ प्राधिकार पत्र देणे बंद असल्याने खात्यावरील रक्कम मिळत नसल्याने शिक्षक संघटनेने सदरील भविष्य निर्वाह निधी मधून पैसे काढण्यास प्राधिकार पत्रे खुली करून शिक्षकांना दिलासा द्यावा हे खाते तात्काळ खुले करण्याची मागणी मराठवाडा शिक्षक संघाने शासनाकडे केली आहे.
       मराठवाडा शिक्षक संघ चे जिल्हा अध्यक्ष प्राचार्य भगवान पुर्णे असे म्हणाले की, राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते शासनाकडे असते. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा रक्कम कपात करून या भ. नि. नि. च्या खात्यात वेतन पथकामार्फत जमा केली जाते. कर्मचाऱ्यांच्या आडचणीच्या प्रसंगी म्हणजे विवाह, आजारांवरील उपचार, प्लॉट - घर खरेदी, मुलांचे शिक्षण वगैरे बाबींसाठी परतावा कर्ज व ना परतावा रक्कम या खात्यातील जमा रक्कमेपैकी पैसे मिळतात. तसेच सेवा निवृत्तीनंतर अंतिम प्रदानाची (उर्वरित) रक्कम मिळते.
    " पाल्याचे विवाह, आजारपणातील उपचार, प्लॉट - घर खरेदी आदींबाबत काही कर्मचाऱ्यांनी मार्च २०२० व त्या पुर्वी वेतन पथकाकडे रितसर मागणी अर्ज विहित प्रपत्रासह मागणी सादर केलेली आहे. सदरील प्रस्ताव वेतन पथकाने मंजूर सुद्धा केले आहेत. परंतु शासनाने बीडीएस ब्लॉक केले आहे. त्यामुळे शिक्षक-शिक्षकेतरांना पैसे मिळेनासे झाले आहे. विशेष म्हणजे सेवा निवृत्तांना सुद्धा त्यांच्या हक्काचे व पगारीतून कपात करण्यात आलेली रक्कम त्यांना मिळत नाही ही खेदजनक बाब आहे."असे निवेदन संघटनेचे मराठवाड्याचे अध्यक्ष पी एस घाडगे यांनी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री व शिक्षण मंत्री यांना सादर केले आहे. तरी शासनाने भ. नि. नि. चे ब्लॉक केलेले बीडीएस खुले करावे अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघ चे सरचिटणीस व्ही जी पवार, जिल्हा अध्यक्ष प्राचार्य बी एस पुर्णे, बी. टी. सांगळे, जी डी. पोले, एन टी सोळंके आदिंनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन