चला मराठा बांधवांनो कुणबी प्रमाण पत्र घ्यायला
परभणी जिल्ह्यात कुणबी जात प्रमाणपत्रासाठी १० ते १७ सप्टेंबर दरम्यान विशेष शिविरांचे आयोजन; जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
परभणी:
जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षांच्या निर्देशांनुसार परभणी जिल्ह्यातील पात्र नागरिकांना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र जलद गतीने मिळण्यासाठी मंडळ स्तरावर १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान विशेष शिविरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिविरांचा लाभ सर्व पात्र नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे (प्रेसनोट) केले आहे.
विविध तालुक्यांतील शिविरांचे वेळापत्रक व ठिकाणे
- परभणी: टाकळी कु., झरी,ेडगाव, सिंगणापूर, दैठणा, पिंगळी, जांब, परभणी शहर/ग्रामीण (दि. ११/०९/२०२६)
- गंगाखेड: मरडसगाव (१०/०९/२०२६), महातपुरी (११/०९/२०२६), माखणी (१२/०९/२०२६), पिंपळदरी (१३/०९/२०२६), राणीसावरगाव (१५/०९/२०२६)
- पूर्णा: ताडकळस, लिमला, चुडावा (१०/०९/२०२६), पूर्णा, कातनेश्वर, कावलगाव (११/०९/२०२६)
- पालम: पालम (पुंयणी), चाटोरी (१०/०९/२०२६), पेठशिवणी (भोगाव) (११/०९/२०२६), रावराजुर, तांदुळवाडी (१५/०९/२०२६)
- सेलू: सेलू, वालुर (११/०९/२०२६), चिकलठाणा बु., देऊळगाव गा. (१५/०९/२०२६), कुपटा, मोरगाव (१६/०९/२०२६)
- जिंतूर: जिंतूर, बोरी (१०/०९/२०२६), दुधगाव, आडगाव ख. (११/०९/२०२६), सांगवी मा., बामणी (१५/०९/२०२६), चारठाणा, वाघी धा. (१५/०९/२०२६)
- पाथरी: पाथरी (१०/०९/२०२६), बाभळगाव (११/०९/२०२६), हादगाव बु. (१५/०९/२०२६), कासापुरी (१६/०९/२०२६)
- मानवत: रामपुरी बु. (१०/०९/२०२६), मानवत, केकरजवळगा (११/०९/२०२६), कोल्हा, ताडबोरागाव (१५/०९/२०२६)
- सोनपेठ: आवलगाव (बोदरगाव) (११/०९/२०२६), सोनपेठ (थडी पिंपळगाव), वडगाव, शेळगाव (शिर्शी बु.) (१५/०९/२०२६)
जिल्ह्यातील नोंदी व जात प्रमाणपत्रांची सद्यस्थिती
पत्रकार परिषदेतील संक्षिप्त टिपणीनुसार, जिल्ह्यात १३ विभागांतील २५,३०,०९६ अभिलेख्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये ३,७९४ कुणबी नोंदी (मोडी भाषेत ३,७८८ व इतर ६ नोंदी) आढळल्या आहेत. या सर्व नोंदींचे मराठीत भाषांतर करून www.parbhani.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
- एकूण प्राप्त अर्ज: २०,८६६
- निर्गमित जात प्रमाणपत्रे: २०,७७४ (यात हैदराबाद गॅझेटिअरनुसार २,६१९ अर्ज निर्गमित करण्यात आले आहेत)
- नांजूर अर्ज: २९
- प्रलंबित अर्ज: ८
जिल्हा प्रशासनाने सर्व पात्र नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शिविरांमध्ये उपस्थित राहून लाभ घेण्याचे, तसेच अडचणी आल्यास नियंत्रण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment