लोकमान्य नगर मधील श्री शनी मंदिर जीर्णोधार कार्य पूर्ण

लोकमान्य नगर मधील श्री शनी मंदिर जीर्णोधार कार्य पूर्ण

सुशोभीकरण कार्य मध्ये विशेष सहभाग बद्दल परभणी विधानसभा आमदार डॉ राहुल पाटील यांचा मंदिर संस्थान वतीने जाहीर सत्कार करण्यात आला







परभणी (प्रतिनिधी ) - येथील लोकमान्य नगर श्री शनी मंदिर चे जीर्णोधार कार्य गेली सहा महिने पूर्वी सुरु करण्यात आले होते. लोकमान्य नगर श्री शनी मंदिर जीर्णोद्धार कार्य पूर्ण झाले त्यानिमित्ताने आज दि 09 फेब्रुवारी सायं 7 वा जीर्णोद्धार कार्यात तन मन धन रूपाने सेवा देणारे भाविक भक्त यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम मध्ये परभणी विधानसभा आमदार डॉ राहुल पाटील यांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला मंदिर सुशोभीकरण कार्य करिता आमदार डॉ पाटील यांनी विशेष योगदान केले होते.मंदिर संस्थानचे वतीने सर्वांचा शाल श्रीफल पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी श्री शनी मंदिर संस्थानचे अध्यक्ष नितीन पारवेकर, प्रा.जयप्रकाश गायकवाड , सुरेश फड, सुधाकर सिंग,शिवा चव्हाण, संजय ठकारे, रमेश चांदिवाले, संतोष पाठक, भारत कुलकर्णी, महेश सावंत, प्रकाश पाटील,जगन्नाथ घोडके,गजानन पिसे, प्रहलाद जाधव, रितेश जैन, महेश बासटवार, ऍड खलिकर,प्रा.प्रकाश मोरे, प्रा. कारभारी कदम,प्रा यशवंत घारे,गणेश टाक, सोनू लाहोटी, प्रा.बाळासाहेब जाधव ,मंदार कुलकर्णी, प्रतापसिंग चाव्हाण,सुरेश नांदेडकर, अनिल दमकोडे, विजय दराडे, शिवाजी वांगे, राजेश ताठे , ठाकरे, रमेश शिर्के, नरेश देशमुख, नवनीत पाचपोर, मकरंद कुलकर्णी आदीसह शेकडो भावीक भक्त उपस्थित होते कार्यक्रमचे सूत्रसंचालन संतोष पाठक यांनी तर आभार प्रदर्शन प्रा जयप्रकाश गायकवाड यांनी केले परभणी लोकमान्य नगर मधील शनि मंदिर परिसर अतिशय निसर्गरम्य वातावरण मध्ये आहे जीर्णोद्धार झाले नंतर शनी मंदिर चा लक्षनीय कायापालट झालेला पाहायला मिळत आहे भाविक भक्त मध्ये उत्साहचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन