सुशिक्षित बेरोजगारांसाठी शनिवारी रोजगार मेळावा

 सुशिक्षित बेरोजगारांसाठी शनिवारी रोजगार मेळावा

परभणीदि. 22 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रप्रधानमंत्री कौशल्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा शनिवारी (दि. 26) सकाळी साडेनऊ वाजता प्रधानमंत्री कौशल्य केंद्र पॉलिटेक्निक वर्कशॉप श्री शिवाजी महाविद्यालय परिसर येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास विविध नामांकित कंपनीतील उद्योजकांनी सहभाग नोंदविला असून सदर रोजगार मेळाव्यामध्ये युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त प्र.सो.खंदारे यांनी केले आहे. 

या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर नोकरी साधक म्हणून नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ९८९०८२८७९७९८६००१५३८३ आणि ९६२३०२०९३४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज