1 डिसेंबर पासून कलम 36 लागू राहील

 जिल्ह्यात एक डिसेंबरपासून कलम 36 लागू

 

परभणी दि.24 :-  जिल्ह्यात डॉबाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनबाबरी मशीद रामजन्मभूमी संदर्भाने सर्व धर्म वेगवेगळा दिवस पाळताततसेच राज्यातील शेतकरी संघटनेतर्फे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेयासाठी ते 15 डिसेंबरदरम्यान मुंबई पोलीस कायदा कलम 36 लागू करण्यात आला असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आरयांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

परभणी जिल्ह्यात या कलमाअन्वये पोलीस विभागाची तारीखवेळसभेची जागामिरवणुकीचा मार्ग त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा निश्चित केल्याशिवाय आयोजित करु नयेततसेच यादरम्यान कोणत्याही नियमांचे किंवा आदेशाचे उल्लंघन होणार नाहीयाची काळजी घ्यावीहा आदेश लग्न वरातप्रेतयात्रा व धार्मिक कार्यक्रमास लागू होणार नाहीअसे त्यांनी आवाहनात सांगितले आहे.

Comments