शेतकरी बांधवनो शेततळे अस्तरीकरण साठी त्वरित अर्ज करा

शेतकरी बांधवांनो शेततळे  अस्तरीकरणासाठी  अर्ज करा

 परभणी, दि. 24 :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2022-23 व राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत सामूहिक व वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी अनुदान देण्यात येत आहे. त्यानुसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांनी केले आहे. पाणीसाठा निर्माण करणे व साठवलेले पाणी वाया जावू नये, तसेच उन्हाळ्यात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा वापर व्हावा, या हेतूने 50 टक्के अनुदानावर ही योजना राबविण्यात येत आहे. शेतक-यांनी स्वखर्चाने अथवा विविध शासकीय योजनेतून शेततळे खोदकाम केले आहे, अशा पात्र शेतक-यांनी तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गंत 100 टक्के अनुदानावर शेततळ्याची योजना राबविण्यात येत आहे. या दोन्ही योजनांमध्ये पात्र असलेल्या शेतक-यांनी महाडीबीटी (mahadbtmahait.gov.in) पोर्टलवर अर्ज करावेत, तसेच अधिक माहितीसाठी कृषि कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त