ब्रिटिशांनी आपली समृद्ध शैक्षणिक परंपरा नष्ट करून आपल्यात न्यूनगंड निर्माण केला ! – डॉ. प्रभाकर मांडे, ज्येष्ठ लोकसाहित्यकार

 ब्रिटिशांनी आपली समृद्ध शैक्षणिक परंपरा नष्ट करून आपल्यात न्यूनगंड निर्माण केला ! – डॉ. प्रभाकर मांडे, ज्येष्ठ लोकसाहित्यकार

पुणे – भारताला समृद्ध अशी शैक्षणिक परंपरा होती; परंतु ब्रिटिशांनी ही परंपरा नष्ट केली आणि आपल्यात न्यूनगंड निर्माण केला. हा सगळा इतिहास वाचण्याची आवश्यकता आहे. नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला विद्येच्या परंपरेला जागे करण्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक आहे. त्यादृष्टीने धोरणाकडे पहायला हवे, असे मत ज्येष्ठ लोकसाहित्यकार डॉ. प्रभाकर मांडे यांनी व्यक्त केले. चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने लोकसाहित्याचे लेखन केलेल्या डॉ. मांडे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्र सरकारच्या सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, पुरातत्वशास्त्राचे तज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आदी उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रंगसंमेलनात या पुरस्काराचे वितरण झाले.

संपादकीय भूमिका

भारतियांनो, ब्रिटिशांनी नष्ट केलेली आपली शैक्षणिक परंपरा समृद्ध होण्यासाठी प्रयत्न करा !

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन