थेट कर्ज योजनेसाठी अर्ज आमंत्रित

 थेट कर्ज योजनेसाठी अर्ज आमंत्रित

 

परभणीदि. 22 :- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून 2022-23 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजना राबविली जाणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील मातंग समाजातील इच्छुक अर्जदारांकडून 20 डिसेंबरपर्यंत कर्ज प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहेत असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक चंद्रकांत साठे यांनी केले आहे.

            जिल्ह्यातील मातंग समाजातील इच्छुकांना नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी हे अर्ज मागविण्यात येत असूनयासाठी त्यांना 40 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण व 50 पेक्षा जास्त नसावे. त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा जास्त नसावे. आणि त्याने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराने अर्ज तीन प्रतींमध्ये मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहून दाखल करावा.

  इच्छुक अर्जदारांन योजनेच्या अटी व शर्थी आणि अधिक माहितीसाठी 28 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2022 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळजिल्हा कार्यालयडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनजायकवाडी वसाहतकारेगाव रोड परभणी येथे अर्ज करावेत.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन