अखेर स्वर्णम उर्फ डुग्गु सापडला

अखेर स्वर्णम उर्फ डुग्गु सापडला
मागील आठवड्यात झाले होते त्याचे बाणेर येथून अपहरण





 पुणे (टिळक रत्न प्रतिनिधी)-  पुण्यातील बाणेर परिसरातून पाच ते सहा दिवसांपूर्वी चार वर्षीय डुग्गू उर्फ स्वर्णम चव्हाण या चिमुरड्या मुलाचे एक व्यक्तीद्वारे 6 दिवसखाली अपहरण करण्यात आले होते . पोलीस यंत्रणा कसून त्याचा शोध घेण्यास कामाला लागली होती ,पोलिसांच्या तपासाला यश मिळाले . अखेर हा चिमुरडा पोलिसांना पुनावळे येथे आज दि 19 जानेवारी रोजी सापडला . पिंपरी - चिंचवड परिसरातील पुनावळे येथे पोलिसांना तो सापडला . मागील आठवड्यात बालेवाडीमधून चार वर्षांच्या स्वर्णमचे अपहरण केले गेले होते . त्यानंतर स्वर्णमचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती . पुणे पोलिसांची मोठी फौज मुलांला शोधत होती , खूप गुप्तता पाळून हा तपास सुरू होता , जवळपास ३०० ते साडे तीनशेच्या वर पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलांचा शोध घेत होते . अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश मिळाले.बातमी हाती लागे पर्यंत मुलाला पालकांकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू होती अपहरण करणारे व्यक्तीने कोणत्या कारणास्तव हे केले ह्याचा तपास सुरू होता

Comments

Popular posts from this blog

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज