स्टेच्यु ऑफ युनिटी एक्सप्रेस लवकरच सुरू करू : डॉ. कराड 

स्टेच्यु ऑफ युनिटी एक्सप्रेस लवकरच सुरू करू : डॉ. कराड 



 औरंगाबाद ( टिळक रत्न प्रतिनिधी )- केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या कडे मराठवाडा व महाराष्ट्रातील नागरिकांना स्टेच्यु ऑफ युनिटी परिसर व व्यापारी हितासाठी 'स्टेच्यु ऑफ युनिटी एक्सप्रेस' सुरू करावी अशा मागणीचे निवेदन दि.१५ जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टी चे जिल्हा कार्यालयमंत्री व्यंकटेश कमळू यांचे सह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ' केवडिया' , जिल्हा नर्मदा ,गुजरात.येथे भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा व म्युझियम ( स्टेच्यु ऑफ युनिटी) परिसरात अत्यंत सुंदर पर्यटन परिसर विकसित केला आहे.स्टेचू ऑफ युनिटी च्या दर्शनाने भारतावासीयांचे राष्ट्रप्रेम जागृत होते. महाराष्ट्रातुन व मराठवाडयातून ही खूप मोठ्या प्रमाणात जनता ' स्टेच्यु ऑफ युनिटी ' केवडिया येथे पाहण्यासाठी जात असते. स्टेच्यु ऑफ युनिटी,गरुडेश्वर मंदिर, नीलकंठ धाम- पोईचा, कुबेर भंडारी असा मोठा पर्यटन परिसर तिथे आहे.रेल्वे मार्ग सुरत मार्गे असल्याने महाराष्ट्रातील व्यापारी वर्गासही याचा मोठा फायदा होणार आहे." नांदेड - पूर्णा - परभणी - जालना- औरंगाबाद - जळगाव - सुरत - वडोदरा - केवडिया "अशी साधारणपणे 1075 किलोमीटर अंतर धावणारी 'स्टेच्यु ऑफ युनिटी एक्सप्रेस ' सुरू केल्यास पर्यटक व नागरिकांना व व्यापाऱ्यांना सोय व सुविधा निर्माण होईल.निवेदन दिल्या नंतर केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी अशी रेल्वे सुरू करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करून लवकरात लवकर अशी रेल्वे सुरू करण्या बाबत आश्वासन दिले आहे. ' स्टेच्यु ऑफ युनिटी एक्सप्रेस ' सुरू करण्यासाठी निवेदन देताना रेल्वे प्रवाशी संघटनेचे राजू सानप, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष दीपक ढाकणे, भाजपा मंडळ अध्यक्ष प्रवीण कुलकर्णी, अजय शिंदे,राजू पाटील ,अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नबी पटेल आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन