परभणीतील हे परिसर केले नागरिकांसाठी प्रतिबंधित (या भागातील नागरिकांनी बाहेर बिलकुल पडू नये)

शहरातील हे भाग केले नागरिकांसाठी प्रतिबंधित - या परिसरातील नागरिकांनी बिलकुल बाहेर पडायचे नाहीये
परभणी (प्रतिनिधी)- परभणी शहरात बाहेरच्या जिल्ह्यातुन आलेल्या एक व्यक्तीस कोरोना विषाणूचा  संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या नंतर तो रुग्ण ज्या भागात वास्तव्यास होता त्या ठिकाणच्या सर्व परिसर निर्जंतुकिकरण करण्यात येत आहे त्याच बरोबर इतर कोणत्याही नागरिकांना याचा अपाय होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून याभागातील नागरिकांनी येते काही दिवस बिलकुल बाहेर पडू नये हे नागरी भाग नागरिकांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे या भागाची नावे पुढील प्रमाणे आहेत दुर्गा नगर, कपिल नगर, सहारा नगर वृंदावन नगर, प्रबुद्ध नगर, महात्मा फुले नगर ,प्रियदर्शनी नगर,  अहिल्यादेवी होळकर नगर, राजे सँभाजी नगर , सुंदराई नगर ,जिजाऊ नगर ,रामदास नगर, कृषी सारथी कॉलोनी, श्रेयस नगर, समाधान नगर , मथुरा नगर, रचना नगर सोमनाथ नगर, राजेन्द्र गिरी नगर ,आंबा भवानी नगर ,गाडगेबाबा नगर,मथुरा नगर गोकुल नगर, गजानन नगर, साईबाबा नगर ,भाग्य नगर , ए वन मार्केट ह्या नगरात नागरिकांनी कोणत्याही कामा करिता बिलकुल बाहेर पडू नये. केेेवळ अत्यावश्यक वस्तू व सेेवा, अडचण अथवा मदत लागल्यास मनपा च्या वतीने आपल्या भागातील वसुली लिपिक (बिल कलेक्टर)  पदावर असलेले विठ्ठल सावणे (9405766664),दिगंबर जाधव (9823961691),विठ्ठल शेळके(9421764771) , झुबेर हाश्मी (9890664054), विठ्ठल गिराम(9049223364),पांडुरंग रणेर (7588018418), सुनील भराडे (8379956387) हे सर्वाना आपण बोलवू शकता हे मदत करतील असे मनपा व जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन