धनंजय मुंडे यांचे सुचनेवरून संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी 4000 रु प्रदान

धनंजय मुंडे यांच्या सुचनेवरून संजय गांधी निराधारांच्या 4087 लाभार्थींना चार महिन्याचे प्रत्येक 4 हजार रुपये तर श्रावणबाळ 10,890 लाभार्थ्यांच्या खात्यात दोन महिन्याचे प्रत्येक 2 हजार रुपये जमा-डॉ. संतोष मुंडे*

_दिव्यांगांनी बँकेत गर्दी न करता शासनाच्या नियमांचे पालन करावे_


● परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचनेवरून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील संजय गांधी निराधारांच्या 4087 लाभार्थींना चार महिन्याचे प्रत्येक 4 हजार रुपये तर श्रावणबाळ 10,890 लाभार्थ्यांच्या यांच्या खात्यात दोन महिन्याचे प्रत्येकी एक हजार रुपये यांचे मानधन वर्ग करण्यात आले आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दिव्यांग बांधवांनी बँकेत गर्दी न करता सोशल डिस्टन्स तसेच शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे. 

        कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व त्याअनुषंगाने सुरू असलेले लॉकडाऊन यामुळे  दिव्यांग व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या सुचनेवरून संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना या योजनेतील चार महिन्यांचे अँडवान्स मानधन लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले आहे. 
या मध्ये संजय गांधी निराधारांच्या 4087 लाभार्थींना चार महिन्याचे प्रत्येक 4 हजार रुपये खात्यात जमा करण्यात आले. तर श्रावणबाळ 10,890 लाभार्थ्यांच्या खात्यात दोन महिन्याचे प्रत्येक 2 हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील निराधार, वृध्‍द, दिव्‍यांग, विधवा, घटस्‍फोटिता, परित्‍यक्‍ता आदी वंचित व दुर्बल घटकांना  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने जनता कर्फ्यू, जमावबंदी, संचारबंदी व देशभर लॉकडाऊन घोषित केले. याच पार्श्वभूमीवर दिव्यांग बाधंवांना अशा आपत्कालीन परिस्थिती खात्यात मानधन जमा झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. कोरोना साथजन्य आजाराच्या कठीण दिवसांत आर्थिक मदतीचा आधार दिल्याबद्दल पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, परळीचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार डॉ. विपीन पाटील, नायब तहसीलदार बी.एल. रूपनर, लिपिक गोवर्धन गर्जे यांचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांचे साजन लोहिया व अपंग, विधवा, ज्येष्ठ नागरिक, आणि माजी सैनिक संघटनेने आभार मानले आहेत. 
         केंद्र शासनाने जनता कर्फ्यू, जमावबंदी, संचारबंदी व देशभर लॉकडाऊन घोषित केले हे लक्षात घेऊन घरातून बाहेर पडणे टाळा. कोरोनामुळे जगात हाहाकार माजला असुन नागरिकांनी, दिव्यांग बाधवांनी घरातच बसा, गरज असेल तरच घराबाहेर पडा, गर्दी टाळा, बँकेतून मानधन काढतांना गर्दी करू नये सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे असे आवाहन 
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केले आहे. 

*धनंजय मुंडे हे दिव्यांग बांधवांच्या सदैव तत्पर*
       राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत व नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व त्याअनुषंगाने सुरू असलेले लॉकडाऊन यामुळे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा नियंत्रण कक्ष २४ तास सुरू असणार आहे. या कशाच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांगाच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी मदत झाली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिव्यांग बाधवांच्या समस्या  सोडविल्यामुळे दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे साहेब हे राज्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी आपत्कालीन परिस्थिती मौलाचे काम करू जिवाचे रान करीत आहेत. त्यांचे दिव्यांग बांधवांच्या बाबतीतले कार्य कौतुकास्पद आहे. धनंजय मुंडे साहेब त्यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांनी त्यांच्या प्रश्नांची अजिबात काळजी करू नये. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे डॉ. संतोष मुंडे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन